Bicholim Market : डिचोली बाजार ;कोथिंबीरीची एक जुडी ५० रुपयांवर

Bicholim Market : तसे संकेतही डिचोलीच्या बाजारातील विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. सध्या बाजारात वालपापडी आणि ओली कोथिंबीर भाव खात आहे.
Bicholim Market
Bicholim Market Dainik Gomantak

Bicholim Market :

डिचोली, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कर्नाटकातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्या महाग होण्याच्या वाटेवर आहेत.

तसे संकेतही डिचोलीच्या बाजारातील विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. सध्या बाजारात वालपापडी आणि ओली कोथिंबीर भाव खात आहे. एकाबाजूने वालपापडीचे दर अजून नियंत्रणात येत नाहीत. तर दुसऱ्या बाजूने ओली कोथिंबीर महाग झाली आहे. अन्य भाज्याही हळूहळू वाढत आहेत.

भाज्या महागण्याचे संकेत

डिचोली बाजारात बहुतांश भाजी कर्नाटक राज्यातून येत असते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून डिचोलीत भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या डिचोलीत कांदे ४० रुपये, टोमॅटो ३० रुपये तर बटाटे ४० ते ५० रुपये किलो या दराने विकण्यात येत आहेत. भेंडी, चिटकी अन्य भाज्या ८० रुपये किलो या दराने विकण्यात येत आहेत.

Bicholim Market
Goa Todays' Live News: पर्यटक पोलिस कोलवा समुद्रकिनारी तीन ऑलिव्ह रिडले कासवांना जीवदान

वालपापडी २४० किलो

वालपापडी अजूनही स्वस्त होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ती २४० रुपये किलो असे वालपापडीचे दर आहेत. दुसऱ्या बाजूने कोथिंबीर मात्र प्रचंड भाव खाऊ लागली आहे. सध्या ५० रुपये जुडी असे ओली कोथिंबीरचे दर आहेत. आणखी किमान महिना ते दीड महिनापर्यंत भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असे विक्रेते रमेश रेड्डी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com