Bicholim News : डिचोली परिसरात कचऱ्याची दुर्गंधी; रोगराईची भीती

Bicholim News : स्वच्छ शहरात टाकाऊ भाजी टाकण्याचा प्रकार
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या डिचोली शहरात एका ठिकाणी सध्या कचऱ्याची भयानक समस्या निर्माण झाली असून कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

शहरातील ‘बागायतदार बाझार’ या स्वयंसेवी भांडारासमोरच भर रस्त्यावर गजबजलेल्या ठिकाणी उघड्यावर मोठ्या प्रमाणात टाकाऊ भाजी टाकण्याचे प्रकार घडत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शनिवारी दुपारपर्यंत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत भाजी रस्त्यावरच एका कोपऱ्यात पडून होती. पावसामुळे ही भाजी कुजून गेली होती. दरम्यान, कुजलेली भाजी शनिवारी पालिकेने उचलली खरी. मात्र, सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणी टाकाऊ भाजी टाकण्याचा प्रकार घडला आहे.

Bicholim
Bike Winter Care Tips: हिवाळ्यात बाइक सुरू होत नाहीय? 'या' सोप्या टिप्सचा करा वापर

ज्या ठिकाणी ही टाकाऊ भाजी टाकण्यात येत आहे. त्या ठिकाणी वाहने उभी असतात. त्यामुळे हा कचरा सहजासहजी लक्षात येत नाही. मात्र, दुर्गंधीमुळे त्याची जाणीव होत आहे. ही टाकाऊ भाजी कोण टाकतात. त्याबद्दल माहिती नाही.

मात्र, ही भाजी कुजत असल्याने सध्या भयानक समस्या निर्माण होत आहे. दुर्गंधीमुळे सध्या बाजारहाट किंवा अन्य कामांसाठी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना नाक मुठीत धरावे लागत आहे. डासांचीही पैदास वाढली असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

कारवाई व्हायलाच हवी :

शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या ठिकाणी बेशिस्तपणे टाकाऊ भाजी टाकून अस्वच्छता निर्माण करण्याच्या या प्रकाराबद्धद्दल नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि आरोग्याची समस्या निर्माण करण्याच्या या प्रकाराबद्दल आनंद नार्वेकर आणि इतरांनी संताप व्यक्त केला आहे. हा कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील आस्थापनांतील सीसी टीव्ही फुटेज तपासल्यास हा कचरा कोण टाकतोय ते उघड होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com