Bicholim News : उष्म्याबरोबरच वणवेही पेटले; जवानांची धावपळ

Bicholim News : डिचोलीत एकाच दिवशी चार ठिकाणी आग
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, वाढत्या उष्म्याबरोबरच राज्यात आग लागण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. बुधवारी डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात एकाच दिवशी चार ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.

या आगीत विशेष वित्तहानी वा अनर्थ घडला नसला, तरी अग्निशमन दलाच्या जवानांची दिवसभर धावपळ झाली. मयेसह बोर्डे आणि आमोणे भागात मिळून चार ठिकाणी गवताला आग लागली.

दरम्यान, सायंकाळी उशिरा आमोणे परिसरात आग लागण्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे अग्निशमन दलाचे हवालदार साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. याकामी संदीप परब (चालक), व्ही. एन. राणे, योगेश माईणकर आणि हर्षद सावंत यांनी मदतकार्य केले.

Bicholim
Goa Road Accident: चिंताजनक! अडीच महिन्‍यांत अपघाती बळींची पन्नाशी!

प्राध्यापक, विद्यार्थी धावले मदतीला

मये येथील सरकारी तंत्रनिकेतन जवळील माळरानाला बुधवारी सायंकाळी आग लागली. आग लागताच अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मदतकार्य सुरु केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com