Bicholim News : धावत्या दुचाकीवर कोसळली फांदी; वाहतूक खोळंबली

Bicholim News : मुळगावातील घटना दुचाकीस्वाराचा पाय मोडला,
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली,अवकाळी पावसामुळे मंगळवारी रात्री डिचोलीत चार ठिकाणी झाडांची पडझड झाली असतानाच बुधवारी तीन ठिकाणी झाडांची पडझड झाली. मुळगाव येथील एका घटनेत एक दुचाकीस्वार युवक जखमी झाला.

तसेच डिचोली-अस्नोडा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबून राहिली. गुलमोहराची भलीमोठी फांदी धावत्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार युवक सुदैवाने बचावला, मात्र त्याचा पाय मोडला. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास डिचोली-अस्नोडा रस्त्यावरील शिवोलकरवाडा-मुळगाव येथे घडली.

गुलमोहराची फांदी रस्त्यावर आडवी झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक तासभर खोळंबून राहिली. या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव रेहमान पाशा असे असून, तो मूळ बिहार येथील असल्याची माहिती मिळाली आहे. वीजवाहिन्या तोडून फांदी रस्त्यावर कोसळली. या घटनेत वीज खात्याचे आर्थिक नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे उपअधिकारी शिवाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली फांदी कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अग्निशमन दलाचे विठ्ठल गाड आणि रामदास परब (चालक ऑपरेटर) यांच्यासह सुनील गावस, सागर कुंकळकर, आदित्य गावस, प्रदेश मोहन आणि अनुप नाईक या जवानांनी मदतकार्य केले.

अशी घडली घटना...

मिळालेल्या माहितीनुसार, रेहमान पाशा हा युवक जीए-०३-एजी-२४६३ या मोटारसायकलवरुन डिचोलीच्या दिशेने जात होता. शिवोलकरवाडा-मुळगाव येथे मोटारसायकल पोचली असता अचानक रस्त्याच्या बाजूने असलेल्या गुलमोहराची भलीमोठी फांदी आडवी झाली. या फांदीखाली तो अडकला. स्थानिकांनी लगेच धावपळ करून त्याला बाहेर काढले व उपचारासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेले.

Bicholim
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

पाळीत दोन झाडे कोसळली :

बुधवारी दुपारी पाळी येथेही दोन ठिकाणी झाडे कोसळली. एका घटनेत आंबेगाळ येथे नवदुर्गा हायस्कूल जवळ वीजवाहिन्या तोडून एक झाड रस्त्यावर कोसळले. अन्य एका घटनेत तळेवाडा येथील वरद गणपती मंदिराजवळ रस्त्यावर एक झाड कोसळले.

अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर महेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल गावस (चालक ऑपरेटर), महेश देसाई, संजय उसपकर आणि नीलेश हळर्णकर या जवानांनी मदतकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com