मिरामार किनारी रंगणार ‘बीच कार्निव्हल’

चार दिवस कार्यक्रम: गोमंतकीय खाद्यपदार्थांच्या मेजवाणीचे आकर्षण
Goa Carnival Festival
Goa Carnival FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशात तसेच जगभर प्रसिद्ध असलेला गोवा कार्निव्हल (Carnival in Goa) यंदा पर्यटकांना (Tourist) अधिक आकर्षित करणार आहे. मिरामार येथे नव्याने नुतनीकरण केलेल्या पदपथावर बीच कार्निव्हलचे आयोजन केले आहे. पणजीतून या कार्निव्हला महोत्सवाला सुरवात होणार असून हा कार्निव्हल चार दिवस या मिरामार समुद्रकिनारी (Miramar Beach) होणार आहे. उदयोन्मुख खाद्य उद्योजकांना प्रोत्साहन तसेच स्थानिक व पर्यटकांसाठी विविध खाद्यपदार्थांची मेजवाणी उपलब्ध होईल. (Beach Carnival to be held at Miramar Beach in Goa)

पणजी महापालिकेने ‘द बीच कार्निव्हल’ तयार करण्यासाठी गोव्यातील फियर्स किचेन्ससोबत भागीदारी केली आहे. तर नवीन नूतनीकरण केलेल्या पदपथावर स्थानिक स्वयंपाकासंबंधी उद्योजकांसाठी किंवा ‘फूडप्रेन्युअर्स’साठी एक समर्पित झोन आरक्षित केला आहे. ‘बीच कार्निव्हल’मध्ये स्थानिक उद्योजकांची मेजवानी असेल जे या ठिकाणी आपली पाककृती सादर करू शकतील. महोत्सवामुळे खाद्यपदार्थ क्षेत्रातील नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे पणजी महापालिका आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

Goa Carnival Festival
19 मार्चपासून गोव्यात पाच प्रमुख शहरांमध्ये शिगमोत्सव मिरवणूक रंगणार

या महोत्सवात गोव्याची संस्कृती, वारसा आणि स्वागतार्ह भावनेचेही चित्रण केले जाईल. कार्यक्रमात घरगुती स्वयंपाकी, महिला लघु उद्योजक, पेस्ट्री आणि बेकरी आणि इतर पाककला खाद्य व्यावसायिक सहभागी होतील. गोव्यातून उदयास येणारे खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकासंबंधी नवकल्पना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना, फिअर्स किचन्सला पणजी महापालिकेसोबत भागिदारी करण्यात आनंद होत आहे. स्वयंपाकासंबंधी इनक्यूबेटर हे आचारी उद्योजक आणि घरगुती स्वयंपाकी यांना राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठ आणि नेटवर्कमध्ये प्रवेश देऊन स्थानिक खाद्य उद्योजकांसह सर्वच घटकांवर याचा प्रभाव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे मत ‘फिअर्स किचन्स’चे संस्थापक परिक्षित फोंडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Goa Carnival Festival
गोवा विद्यापाठातील विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स ऑफलाईन

संगीताचाही आनंद

26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत महोत्सव सुरू राहिल. प्रेक्षकांना स्थानिक आणि प्रादेशिक कुकिंग टॅलेंट या दरम्यान पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त स्थानिक बँड कोकणी आणि इंग्रजी भाषेत प्रादेशिक संगीताचा आनंद नागरिकांना मिळेल. अनेक कलाकार व संगीतकार आपापली कला येथे सादर करतील. महोत्सवासाठी पर्यटक तसेच स्थानिक प्रेक्षक मोठ्या संख्येने आकर्षित होतील असे मत एआयसीजीआयएमचे सीईओ राजेस जोशी यांनी व्यक्त केले.

या कार्निव्हलसाठी 50 स्टॉल्सना परवानगी आहे. यात काही नवउद्योजक महिलांचाही समावेश आहे. कोरोनामुळे रोजगार गमावलेले अनेक तरुण या उद्योगाकडे वळले आहेत. त्यांच्या व्यवसायाची ओळख या महोत्सवाद्वारे होईल.

- आग्नेल फर्नांडिस, आयुक्त, महापालिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com