Bardez News : पोलिसांच्या सदनिका जीर्णावस्थेत; कोसळण्याची शक्यता

Bardez News : म्हापशात जीव मुठीत घेऊन राहतात कर्मचारी
Bardez
Bardez Dainik Gomantak

Bardez News :

बार्देश, म्हापसा पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या सदनिका सध्या जीर्ण होऊन मोडकळीस आल्या आहेत. सध्या येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून ते जीव मुठीत घेऊन राहात आहेत.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे.

म्हापसा पोलिस स्थानकातील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी ५० वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने सदनिका उभारल्या होत्या. खात्याने अधूनमधून त्यांची पाहणी करून डागडुजी, तसेच इतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु नंतरच्या काळात या सदनिकांकडे ढुंकूनही पाहिले नाही. येथील तीन इमारतींमध्ये सुमारे १६ सदनिका आहेत.

म्हापसा पालिकेचा पुढाकार हवा

यासंदर्भात बार्देश तालुका मामलेदार प्रताप गावकर म्हणाले की, याप्रश्‍नी म्हापसा पालिकेने आम्हाला नोटीस पाठविणे गरजेचे आहे; परंतु आजपर्यंत आम्हाला तशी नोटीस आलेली नाही. त्यामुळे आम्ही पुढे जाऊन ती इमारत बांधण्यासाठी संबंधित खात्याला सांगू शकत नाही.

या इमारतीमध्ये सध्या चार कुटुंबे राहात आहेत. मात्र, त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील रहिवाशांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही सेवा बजावून लांबून येतो आणि रात्रपाळीही करावी लागते. त्यामुळे आम्ही इतरत्र राहू शकत नाही.

Bardez
Calangute Goa: गुगल मॅपमुळे पुणेकर गोव्यात चुकला, कळंगुट बीचवर पोलिसांनी केली कारवाई

स्थानक उभारले; पण सदनिकांकडे दुर्लक्ष

याच सदनिकांच्या बाजूला पूर्वी पोलिस स्थानकाची इमारत होती. ती मोडकळीस येऊन तेथे पावसाचे पाणी गळत होते. याचा त्रास कर्मचाऱ्यांना होत होता. त्याची दखल घेऊन काही वर्षांपूर्वी ती इमारत पाडून नवी सुसज्ज इमारत बांधली. पण त्याचवेळी गृहखात्याने साबांखाला सांगून मोडकळीस आलेल्या सदनिकांची बांधणी करणे गरजेचे होते. पण तसे न झाल्याने आज पोलिस कर्मचारी जीव मुठीत घेऊन येथे राहात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com