Mapusa: केस कापायला जाणाऱ्या अल्पवयीन मुलावर सुरी हल्ला

हल्ला करणाऱ्या संशयिताविरोधात म्हापसा पोलिसांत गुन्हा नोंद
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Crime News: केस कापायला जाणाऱ्या पंधरा वर्षीय मुलासह त्याच्या अल्पवयीन मित्रावर क्षुल्लक कारणावरुन सुरी हल्ला करुन त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी नास्नोळा येथील संशयित शशिकांत मालवणकर याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Crime
Power Shutdown in Bardez: बार्देश तालुक्यातील 'या' भागामध्ये तीन दिवस वीज पुरवठा खंडीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी वायंगिणवाडे नास्नोळा येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलाचे वडील हे तक्रारदार आहेत. पीडित मुलगा व त्याच्या मित्र संशयिताच्या घराजवळ आपल्या आणखी एका मित्रास बोलविण्यासाठी गेले होते.

हा मित्र संशयिताच्या घरीच भाडोत्री म्हणून रहायला असतो. हे तिघेही मित्र सोबतच केस कापण्यासाठी जाणार होते.

यावेळी क्षुल्लक कारणास्तव संशयिताने पीडितास व त्याच्या मित्रास शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर, संशयिताने या दोन्ही अल्पवयीन मुलांवर सुरी हल्ला करुन त्यांना मारण्यासाठी पाठलाग केला असे तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com