Arambol News: हरमल येथील मंदिरात चोरीचा प्रयत्न; मद्यपी चोरट्याला ग्रामस्थांनी दिला चोप

बामणभाटी मंदिरातील प्रकार
Arambol News
Arambol NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Arambol News: भोम परिसरात चोरी करून पळणाऱ्या एका चोरट्याला चोप देण्‍याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. तसाच प्रकार हरमल येथे झाला आहे. बामणभाटी येथील एका मंदिरात चोरी करणाऱ्याला ग्रामस्‍थांनी पकडले व त्‍याला मार देऊन अद्दल घडवली. विशेष म्‍हणजे चोरटा मद्यपान केलेल्‍या अवस्‍थेत होता.

हा प्रकार काल रात्री उशिरा घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, बामणभाटी येथील मंदिरात चोरी करणाऱ्या तरुणाला एका ग्रामस्‍थाने पाहिले. त्‍याने तत्‍काळ लोकांना बोलवून चोरट्याला रंगेहाथ पकडले. चोरीचा प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ग्रामस्‍थांनी पोलिसांना बोलावून चोरट्याला त्‍यांच्‍या स्वाधीन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com