Goa News : सरकारी कारभार जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न : मंत्री सिक्वेरा

Goa News : शिवोलीत ‘पंचायत चलो अभियान’
Siolim
Siolim Dainik Gomantak

Goa News :

कळंगुट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आम्ही मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सरकारचा कारभार सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, आज त्याचाच एक भाग म्हणून मार्ना शिवोलीत जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्याची मला संधी मिळाली. या गोष्टीचा आपल्याला आनंद असल्याचे कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

शिवोली पंचायत कार्यालयात आयोजित सरकारच्या ‘पंचायत चलो अभियान’अंतर्गत कार्यक्रमात मंत्री सिक्वेरा बोलत होते.

यावेळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, बार्देशचे बीडीओ प्रथमेश शंकरदास, शिवोली भाजप मंडळाचे अध्यक्ष मोहन दाभाळे, ओशेलच्या सरपंच ॲड.रेषल हरमलकर,

सडयेंच्या सरपंच दीपा पेडणेकर,आंसगावचे सरपंच हनुमंत नाईक, शिवोली जिल्हा पंचायतीच्या सदस्य सनिशा तोरस्कर, हणजूण उपसरपंच एग्नेस डिसोझा, आंसगाव उपसरपंच सोनिया नाईक, पंचसदस्य अश्विनी पुर्खे उपस्थित होत्या.

Siolim
Leopard In Goa: काणकोणात बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला: मानवी वस्तीकडचा जंगली श्वापदांचा वावर वाढला

आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले,की लोकांनी सरकारी योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी सरकारतर्फे गावोगांवी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित रहावे.

नुकत्याच सुरू केलेल्या ‘पंचायत चलो अभियान’ अंतर्गत कार्यक्रमांना उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडल्यावर संबंधित मंत्र्यांसमोर विधायक मार्गाने तोडगा निघेल.

शनिवारी आयोजित ‘पंचायत चलो’ कार्यक्रमात रवी हरमलकर, मयुर तोरस्कर, यांच्यासह सरपंच अभय शिरोडकर, पंच सदस्य सिंपल धारगळकर आदींनी भाग घेतला. पंचायत कर्मचारी क्षितुजा शिरोडकर, पुनम वेंगुर्लेकर,वियोना परैरा तसेच साबिना फर्नांडिस यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ऐंशीच्या आसपास ग्रांमस्थांनी योजनेचा लाभ घेतला.

पंचसदस्य, सरपंचांचे वेतन वाढवा!

आंसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांनी राज्यातील पंचायतींचे सरपंच तसेच पंच सदस्यांच्या वेतनात वाढ करण्याची जोरदार मागणी केली.

सरपंच व इतर पंच सदस्यांना मिळणारे वेतन अत्यंत तुटपुंजे असल्याने लोकशाही मार्गाने पंचायतीवर निवडून आलेल्या प्रतिनिधींना मोल- मजुरी अथवा खासगी कामे करून उदरनिर्वाह चालवावा लागतो, असेही ते म्हणाले. जर आमदार मंत्र्यांच्या वेतनात वाढ होऊ शकते, तर पंचायत प्रतिनिधींची वेतनवाढ का होऊन शकत नाही, असा संतप्त सवाल सरपंच नाईक यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com