AAP Goa: गोवा निवडणुकीत प्रचारासाठी 45 कोटींचा वापर; पालेकर म्हणातात, 'तर आपने...'

AAP Goa Amit Palekar: प्रचारासाठी एवढे पैसे वापरले असते तर आपने विधानसभा निवडणूक जिंकली असती, असे वक्तव्य पालेकर यांनी केले आहे.
AAP Goa | Amit Palekar
AAP Goa | Amit PalekarDainik Gomantak

AAP Goa Amit Palekar

दिल्ली सरकारचा कथित मद्य घोटाळ्यातील पैसे गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा आरोप ‘ईडी’ने केलाय. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आपने भ्रष्टाचाराचे 45 कोटी रुपयांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रचारासाठी एवढे पैसे वापरले असते तर आपने विधानसभा निवडणूक जिंकली असती, असे वक्तव्य पालेकर यांनी केले आहे.

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मद्य घोटाळ्यातील पैसा गोवा विधानसभेच्या निवडणूक प्रचारात वापरल्याचा आरोप ईंडीने केला आहे.

निवडणुकीत प्रचारासाठी वापरलेले पैसे आमच्या खिशातील असल्याचे अमित पालेकर यांनी म्हटले आहे. मुळात भाजपने निवडणुकीत खूप पैसे खर्च केले, आमच्याकडे कमी पैसे होते तरी देखील दोन जागा जिंकण्यात आम्हाला यश आले. भाजप एवढे पैसे आम्ही निवडणूक प्रचारात खर्च केले असते तर आम्ही गोव्यात विजय मिळवला असता, असे वक्तव्य पालेकर यांनी केले आहे.

AAP Goa | Amit Palekar
No Pay Parking In Panaji: महत्वाची बातमी! राजधानी पणजीतील पे पार्किंग शुल्क दोन महिने राहणार बंद

निवडणुकीत पैसा वापरण्यात आलेल्या काही उमेदवारांनी कबुल केल्याचे सांगितल्यावर त्यात काही तथ्य नसल्याचे पालेकर म्हणाले. आपने २०२२ मध्ये ३९ जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी अनेक उमेदवार माझ्या संपर्कात आहेत. माझ्यासह कोणीच अशाप्रकारच्या पैशाचा वापर केला नसल्याचे पालेकर म्हणाले. तसेच, अनेक उमेदवारांनी सध्या भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चौकशीबाबत ईडीकडून संपर्क साधण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण अमित पालेकर आणि आमदार क्रुझ सिल्वा यांनी दिले आहे. भाजप सुडाचे राजकारण करत असून, हा सर्व प्रकार निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉन्ड) यावरुन लक्ष भटकविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com