Fit Goa Police Mission: पोलिसांना Fit ठेवण्यासाठी गोव्यात Fit Goa Police मिशन!!

Goa Police Initiative: या उपक्रमातून गोवा पोलिसांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासाला जाईल
Goa Police Initiative: या उपक्रमातून गोवा पोलिसांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासाला जाईल
Fit Goa Police Initiative Dainik Gomantak
Published on
Updated on

Fit Goa Police Mission

पणजी: राज्यातील पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी गोवा पोलिसांकडून 'Fit Goa Police' हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातून वेळोवेळी गोवा पोलिसांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासाला जाईल आणि आवश्यक बदल करत पोलिसांचे आरोग्य निरोगी आणि सुरक्षित राहावे यासाठी प्रयत्न केला जाईल.

या कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी DGP आलोक कुमार यांनी शारीरिक स्वास्थ्य किती महत्वाचे आहे यावर भर दिला. पोलिसांच्या खांद्यावर असलेली जबाबदारी फार महत्वाची असते, जोखमीची असते आणि म्हणूनच सर्व पोलीस अधिकारी तंदुरुस्त राहावेत म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

Goa Police Initiative: या उपक्रमातून गोवा पोलिसांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासाला जाईल
Whale Fishing: सोशल इंजिनिअरिंगद्वारे देवमाशाची शिकार! सायबर फ्रॉडचा आधुनिक फंडा

माणसाचे शरीर जेव्हा तंदुरुस्त असते तेव्हाच त्याच्याकडून कामात नीट हातभार लावला जातो. शरीराच्या संबंधित वाढणाऱ्या रोगराईवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे DGP आलोक कुमार म्हणाले. सदर कार्यक्रमाला IGP ओमवीर सिंग देखील उपस्थित होते.

स्थानिक पोलिसांमध्ये BMI मशिन्सचे वाटप करण्यात आले आहे. या मशीनचा वापर करून पोलिसांच्या आरोग्याची दखल घेतली जाईल आणि काही बदल आवश्यक असल्यास तज्ञांकडून मदतही पुरवली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com