Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

Saint Francis Xavier Postal Stamp: गोवा संबंधित विषयावरील टपाल तिकीट ५० वर्षांपूर्वी, २४ डिसेंबर १९७४ या दिवशी, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या गौरवार्थ काढण्यात आले. सेंट झेवियरची छबी असलेले तिकीट सर्वप्रथम १९३१ मध्ये छापले गेले.
St Francis Xavier Potsage Stamp, Goa Postal Stamp History, Portuguese India, Goa Stamps, St. Francis Xavier Honor
St Francis Xavier Potsage StampDainik Gomantak
Published on
Updated on

Saint Francis Xavier Postage Stamps

डॉ. एम. आर. रमेशकुमार

गोवा संबंधित विषयावरील टपाल तिकीट ५० वर्षांपूर्वी, २४ डिसेंबर १९७४ या दिवशी, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या गौरवार्थ काढण्यात आले. पोर्तुगीज काळात जरी पोर्तुगीज भारताची टपाल तिकिटे १८७१ पासून छापली जात असली तरी सेंट फ्रान्सिस झेवियरची छबी असलेले तिकीट सर्वप्रथम १९३१ मध्ये छापले गेले.

हा सहा वेगवेगळ्या तिकिटांचा संच होता ज्यात गोव्यातील सेंट झेवियरचे आगमन, बॉम जीजस बॅसिलिका आदीचा समावेश होता. त्यानंतर १९४६ यावर्षी भारतातील एका ऐतिहासिक पुरुषाला श्रद्धांजली म्हणून टपाल तिकीट छापण्यात आले व १९४८ मध्ये ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव करून टपाल तिकीट छापले गेले.

१५ ऑक्टोबर १९५२ रोजी त्यांच्या मृत्यूला चारशे वर्षे झाल्यानिमित्त तीन तिकिटे जारी करण्यात आली होती ज्यात त्यांचा पुतळा, चमत्कार घडवणारा हात आणि समाधी यांचा समावेश होता. तीन पोस्टकार्डचा संच जारी करून वर उल्लेखित स्टॅम्प त्यावर दाखवण्यात आले होते त्याचबरोबर त्यांची छबी असलेले हवाई मेल देखील छापण्यात आले होते. ४ डिसेंबर १९५२मध्ये गोव्यात भरलेल्या पहिल्या फिलेटॅलिक प्रदर्शनाच्या वेळी (एक्स्पोजिसीआंव फिलेटेलिका- गोवा१९५२) सेंट झेवियर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ कव्हर प्रकाशित करण्यात आले. 

St Francis Xavier Potsage Stamp, Goa Postal Stamp History, Portuguese India, Goa Stamps, St. Francis Xavier Honor
St. Xavier DNA Controversy: चर्चने 'सामाजिक भान' राखले! आंदोलनातील संयमी भूमिकेची सर्व स्तरांतून प्रशंसा

त्यानंतर गोवा मुक्तीनंतर गोवा फिलेटली नुमीस्मॅटिक सोसायटीचे सदस्य एस एन प्रभू यांनी १९८४ सालच्या शवदर्शन प्रदर्शनानिमित्त टपाल रद्दीकरण ठसा देवनागरी आणि इंग्रजी लिपीत जारी केला होता.  २४ डिसेंबर १९७४ रोजी पोस्ट विभागाकडून सेंट झेवियर यांच्यावर प्रथम दिन लिफाफा जारी करण्यात आला. त्यानंतर २१ डिसेंबर २०१४ रोजी पणजी येथील संकुलात झालेल्या गोवा बॅग २०१४ यात सेंट झेवियर यांच्यावर विशेष लिफाफा जारी झाला. 

भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिननिमित्त १५ ऑगस्ट २०२० रोजी भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांबद्दल जारी झालेल्या पाच टपाल तिकिटांच्या संचाचा भाग म्हणून बॅसिलिकावर तिकीट आणि लघुपत्रिकेचा समावेश होता. अलीकडेच बॉम जीजस बॅसिलिकाचे चित्र असलेला कायमस्वरूपी रद्दीकरण ठसा गोवा टपाल विभागाने जारी केला आहे तसेच 3 डिसेंबर 2020 रोजी पोस्ट खात्याने सेंट फ्रान्सिस फेस्ताच्या निमित्ताने सचित्र कायमस्वरूपी रद्दीकरण ठसा जारी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com