Crime News : ताळगावात ५ लाखांचा गांजा जप्त ओडीशाचे तिघे गजाआड, ; एनसीकडून कारवाई

Crime News :ड्रग्ज विक्री करण्याचा संशयितांचा व्यवसाय असल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak

Crime News : पणजी, ता. अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पोलिस पथकाने कार्दोसवाडा - ताळगाव येथील एका स्कूलजवळ काल दुपारच्या सुमारास ओडीसीच्या तिघा तरुणांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून ५ किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत ५ लाख रुपये असून न्यायालयाने त्या तिघांची रवानगी कोठडीत केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे बलराम तपन परिदा (२५), कांथराम (३३) व संदीप महाराणा (३१) अशी आहेत. ते मूळचे ओडिसा येथील ़असले तर गेले काही महिन्यांपासून ते सांताक्रुझ व ताळगाव या परिसरात भाडेपट्टीवर राहत आहेत.

संशयित बराम परिदा ह पेंटींग कंत्राटदार असून इतर दोघे संशयित हे सुरक्षारक्षक तथा बाऊन्सर म्हणून काम करत आहेत. ड्रग्ज विक्री करण्याचा संशयितांचा व्यवसाय असल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले आहे.

ताळगावातील एका हायस्कूलजवळ ड्रग्ज विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती या कक्षाच्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार काल सकाळपासून साध्या वेशात पोलिसांचे पथक ते तैनात करण्यात आले होते.

दोन तरुण ड्रग्ज विक्रेत्याची वाट थांबले होते. दुपारच्या सुमारास एक तरुण या ठिकाणी आला. त्याच्याकडे एक पिशवी होती. त्यातील काही माल संशयित बलराम त्या दोन संशयितांना देण्याच्या प्रयत्नात असताना पोलिस पथकाने त्याना घेरले.

पथकाने त्यांच्याकडे असलेल्या ड्रग्ज चाचणी किटने चाचणी केली असता तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Goa Drug Case
Goa News: साकोर्डा पंचायत इमारतीच्‍या कामाला ‘ग्रहण’

परप्रांतीय ड्रग्ज व्यवसायात

ड्र्ग्ज विक्रेते काही शाळांच्या परिसरात तरुण मुलांना आपले लक्ष्य बनवत आहेत. या व्यवसायात झटपट पैसे मिळत असल्याने परप्रांतीय गोव्यात कामासाठी येऊन ड्रग्ज व्यवसायात काम करत आहेत. ताळगावात संध्याकाळच्या वेळी काही ड्रग्ज विक्रेते संशयास्पदरीत्या फिरताना आढळून येत आहेत.

ताळगाव येथून मिरामारकडे जाणाऱ्या रस्त्यावर युवा पिढी रात्रीच्यावेळी घोळक्याने रात्री तेथील कठड्यावर बसत असल्याने ते मद्य व ड्रग्ज नशा करण्यामध्ये सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com