190 कोटी खर्च करुनही बुडण्याच्या घटना सुरूच, बुडून मृत्यू होताना जीवरक्षक का उपस्थित नसतात? युरींचा सवाल

मागील चार वर्षात समुद्रकिनारे, तलाव, नद्या, धबधबे, कालवे आणि चीरेखाणी यासह विविध ठिकाणी 111 बुडण्याच्या घटना.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Yuri Alemao: एका खास कंत्राटदारावर मेहरबानी करण्याच्या हेतूनेच पर्यटन खात्याने गेल्या तीन वर्षांत समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक नेमून पर्यटकांना सुरक्षा पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या कराराला तीन वेळा मुदतवाढ दिली आणि मेसर्स दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रा. लिमीटेड या कंपनीला 2019 पर्यंत तब्बल 190.35 कोटी रुपये फेडले.

पर्यटन विभागाने अनेक कोटी रुपये खर्च करूनही बुडण्याच्या घटना सुरूच आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

कोलवा येथे आज एक व्यक्ती बुडण्याची घटना समोर आली. गोव्यातील इतर ठिकाणी लोकांच्या बुडण्याच्या घटना तसेच समुद्रकिनारे सुरक्षा पुरविणारा कंत्राटदारे अनेकांचे जीव वाचवल्याच्या करीत असलेल्या दाव्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांचा बुडून मृत्यू होत असताना जीवरक्षक का उपस्थित नसतात असा खोचक सवाल आलेमाव यांनी सरकारला विचारला आहे.

मागील चार वर्षात विधानसभेत दिलेल्या माहितीवरून समुद्रकिनारे, तलाव, नद्या, धबधबे, कालवे आणि चीरेखाणी यासह विविध ठिकाणी 111 बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. किनारे सुरक्षा सेवांसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीवर केरी ते पोळे पर्यंतच्या 41 समुद्रकिनाऱ्यांवर तसेच राज्यातील दूधसागर धबधबा आणि मयें तलाव या दोन जलसाठ्यांवर जीवरक्षक तैनात करण्याची जबाबदारी आहे असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

Yuri Alemao
Colva: अमानुषतेची आणखी एक घटना; कोलवा येथे पाळीव कुत्र्यावर ओतले उकळलेले पाणी

पर्यटन खात्याने नेमलेल्या कंत्राटदारावर आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच खडकाळ भागात कुंपण घालणे, धोकादायक खडकाळ भागात गस्त घालणारे जीवरक्षक तैनात करणे तसेच धोक्याची सुचना देणारे फलक लावणे अशा जबाबदाऱ्या आहेत. परंतू, कंत्राटदाराने याची कुठल्याच समुद्र किनाऱ्यावर अमलबजावणी केली नसल्याचा दावा युरी आलेमाव यांनी केला.

राज्यातील विविध समुद्रकिनारे आणि दूधसागर धबधबा व मयें तलावात बुडणारे अनेक जीव वाचविण्याच्या जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पर्यटन खात्याकडे कोणतीही यंत्रणा नाही.

सरकार केवळ एका साक्षीदाराच्या सहिवर सदर दाव्यांची खातरजमा करण्याचा प्रयत्न करते. गोव्यातील विविध ठिकाणी अनेक जीव वाचविण्याबाबत जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराने केलेल्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होतात, असे युरी आलेमाव यांनी निदर्शनास आणले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 34 सीसीटीव्ही कॅमेरे, 34 बीच स्टेशन गोव्यात स्थापन करणे ही दृष्टी लाईफगार्डची जबाबदारी असल्याचे सांगून, यातील किती गोष्टी त्यांनी केल्या आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विविध समुद्रकिनारे आणि दूधसागर धबधबा व मयें तलाव येथे सकाळच्या शिफ्टमध्ये 600 जीवरक्षक आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये 111 जीवरक्षक तैनात करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असताना, खरोखरच एवढे जीवरक्षक हजर असतात का याचे स्पष्टीकरण पर्यटन खात्याने द्यावे अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com