पक्षाच्या निवडणूक आश्वासनांमध्ये गोवा खाणकामाचा मुद्दा महत्त्वाचा का?

गोव्यात राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, कॅसिनो असे अनेक मुद्दे असताना यावेळच्या निवडणुकीत खाणकाम सुरू करण्याचेही आश्वासन दिले आहे.
goa mining
goa miningDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेली 10 वर्षे गोव्याची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, मात्र यावेळी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसनेही भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात खाण सुरू करण्याचे आश्वासनं

गोव्यात राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, कॅसिनो असे अनेक मुद्दे असताना यावेळच्या निवडणुकीत खाणकाम सुरू करण्याचेही आश्वासन दिले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद खाणकामाच्या (Goa Mining) मुद्द्याला वर उचलून धरले आहे. सरकार स्थापन झाल्यास गोव्याच्या महसुलासाठी महत्त्वाचे असलेले खाणकाम पुन्हा एकदा सुरू होईल, असे आश्वासन अनेक राजकीय पक्षांनी गोव्यातील जनतेला दिले आहे. पण गोव्यासाठी खाणकामाचा मुद्दा महत्त्वाचा का आहे? निसर्गसौंदर्यासोबतच सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे गोवा हे जगभरातील पर्यटकांचे नेहमीच आवडते ठिकाण आहे. गोव्याच्या महसुलात पर्यटनाबरोबरच खाणकामही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळेच 2022 च्या विधानसभा निवडणुकीत खाणकामाचा मुद्दा चुरशीचा बनला आहे.

goa mining
Goa Mining: सरकारचा नियमांकडे कानाडोळा

खाणकाम हा महसूलाचा मोठा स्रोत आहे

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) खाणकाम हा मोठा मुद्दा बनला आहे कारण कोविडमुळे राज्याची अर्थव्यवस्था आधीच संकटात आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी वाढत आहे. खाणकाम हे गोव्यासाठी महसुलाचा प्रमुख स्त्रोत आहे, परंतु 2018 साली बेकायदेशीर खाणकामाच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाने खाणकामावर पूर्णपणे बंदी घातली, ज्यामुळे आज गोव्यातील लाखो लोकांचा रोजगार गेला आणि लोकांचे हाल झाले आहेत.

गोव्याच्या डोंगराखाली लाखो टन लोखंड दबलेले आहे. मात्र 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यातील सुमारे 90 खाणी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. शिरगाव येथील रहिवासी असलेल्या अमित गावकर यांनी खाण उद्योगाच्या दृष्टीने सन 2011 मध्ये बँकेकडून 15 लाखांचे कर्ज घेऊन ट्रक खरेदी केला होता, जो एका मायनिंग कंपनीत टाकून महिन्याला 50 हजार कमवू शकतो, परंतु खाणकाम बंद असल्याने त्यांचा ट्रकांनाही गंज चढला आहे.

खाण उद्योगाशी संबंधित लाखो लोक प्रभावित

माहितीनुसार, सुमारे 2.5 लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खाण उद्योगाशी जोडले गेले आहेत. उद्योगांवर निर्बंध लादल्यामुळे शिरगावातील प्रत्येक घराबाहेर ट्रक उभा केलेला दिसतो आहे. गोव्यातील लोक हात जोडून खाण उद्योग सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान मोदींकडे याचना करत आहेत.

आठवडाभरानंतर गोव्यातील जनता आपले नवे सरकार निवडण्यासाठी मतदान करतील, मात्र त्याआधीच राजकीय पक्ष खाणकाम सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत, त्यात सत्तेत बसलेला भाजपही मागे नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील 22 आश्वासनांपैकी भाजपने खाणकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

goa mining
Goa Mining: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याने लिजांचे लिलाव : फडणवीस

पर्यावरणासाठी लढा

दुसरीकडे गोव्यातील पर्यावरणासाठी लढा देणारे आणि खाणकाम विरोधात आवाज उठवणारे राकेश केळकर यांनी या आश्वासनांना गोव्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. बेकायदेशीर खाणकामामुळे गोव्यातील पाण्याची पातळी अनेक फुटांनी खाली गेली आहे, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, असे केळकर म्हणाले.

गोवा खाणकाम हा विषय राजकारणात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारा आहे. विधानसभा निवडणुकीत खाणकाम सुरू करण्याचा दावा प्रत्येक पक्ष करत आहे, पण सध्या तरी आपला रोडमॅप काय असेल, हे एकाही पक्षाला दाखवता आलेले नाही, हे सत्य आहे. जनतेला केवळ निवडणुकीचे आश्वासन म्हणून ते ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com