तरुणीने मागितली सिगारेट, ती न मिळाल्याने पेट्रोल पंपावरच गाडी जाळली; Video Viral

Woman Sets Fire Car: सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये मारामारीचे व्हिडिओ खूप जास्त आहेत.
Woman Sets Fire Car
Woman Sets Fire CarDainik Gomantak

Woman Sets Fire Car:

सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये मारामारीचे व्हिडिओ खूप जास्त आहेत. सिगारेट मागितल्यावर सिगारेट मिळाली नाही तर गाडी पेटवल्याचे तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पेट्रोल (Petrol) पंपावर एक व्यक्ती आपल्या कारमध्ये पेट्रोल भरत आहे. दरम्यान, एक तरुणी त्याच्याजवळ येऊन काहीतरी मागताना दिसते. मात्र, त्या व्यक्तीने देण्यास नकार दिल्याने तरुणीने कार पेटवून दिली. लागलीच आग पसरली आणि संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा त्या व्यक्तीने नकार दिला तेव्हा ती तरुणी काही अंतरावर गेली आणि अचानक परत आली आणि कार पेटवून दिली, ज्यामुळे आग लगेच पसरली. त्यावेळी गाडीची फ्यूल टाकी उघडी होती, त्यामुळे आग लागलीच पसरली. पेट्रोलमुळे आग पसरायला वेळ लागला नाही.

दरम्यान, ही तरुणी कार मालकाकडे सिगारेट मागण्यासाठी गेली होती, मात्र त्याने ती देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याचाच राग आल्याने तरुणीने लायटरने आग लावली. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Woman Sets Fire Car
Israel-Hamas War: कतारची मध्यस्थी फेल! इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होऊ शकला नाही...

सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया

एकाने तिला थेट तुरुंगात पाठवा असे लिहिले. दुसऱ्याने लिहिले की, सिगारेट ओढत असताना या व्यक्तीच्या कारला आग लागली. तिसऱ्याने लिहिले की, जो व्यक्ती सिगारेट पीत नाही तो अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करु शकेल? चौथ्याने लिहिले की, लोकांनी अशा वेड्यापणापासून दूर राहावे, अन्यथा कोणतीही चूक नसताना हाकनाक जीव जाऊ शकतो. दरम्यान, हा व्हिडिओ इस्रायलमधील (Israel) जेरुसलेमचा आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. ही घटना अनेक वर्ष जुनी आहे पण त्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com