खलिस्तानी नेत्याने पुन्हा ओकली गरळ, जनमत संग्रहाचे आयोजन करत...

India-Canada Relations: कॅनडात खलिस्तानी कारवाया थांबायचं नाव घेत नाहीयेत.
Gurpatwant Singh Pannoon
Gurpatwant Singh PannoonDainik Gomantak

India-Canada Relations: कॅनडात खलिस्तानी कारवाया थांबायचं नाव घेत नाहीयेत. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, रविवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जी-20 नेत्यांच्या परिषदेसाठी भारतात होते, तेव्हा खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे तथाकथित जनमत संग्रहाचे आयोजन केले.

प्रतिबंधित शिख फॉर जस्टिस (SFJ) चा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नून सरे, व्हँकुव्हर येथील गुरु नानक सिंग गुरुद्वारा येथे आयोजित खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या मेळाव्यात उपस्थित होता.

पन्नूनने प्रक्षोभक भाषण केलं

एएनआयच्या वृत्तानुसार, पन्नूनने आपल्या प्रक्षोभक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर नेत्यांविरोधात धमकावणारी भाषा वापरली.

फुटीरतावादी भारताच्या क्षेत्रीय अखंडतेला आव्हान देत असल्याचा दावा त्याने केला.

Gurpatwant Singh Pannoon
India-Pakistan Relations: 'चर्चेसाठी टेरर फ्री वातावरण आवश्यक...', मोदी सरकारचे शाहबाज सरकारला सडेतोड उत्तर

पीएम मोदी आणि ट्रुडो यांच्यात चर्चा

पंतप्रधान मोदींनी रविवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्याशी झालेल्या भेटीत कॅनडातील अतिरेकी घटकांकडून सुरु असलेल्या 'भारतविरोधी कारवाया'बद्दल 'गंभीर चिंता' व्यक्त केली होती.

अशा अव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका निवेदनात म्हटले की, 'पंतप्रधानांनी कॅनडातील अतिरेकी तत्वांकडून भारतविरोधी कारवाया सुरु ठेवल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

ते अलिप्ततावादाला प्रोत्साहन देत आहेत आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरुद्ध हिंसाचार भडकवत आहेत, राजनैतिक संकुलांना लक्ष्य केले जात आहे. कॅनडातील भारतीय समुदाय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांनाही लक्ष्य केले जात आहे.'

Gurpatwant Singh Pannoon
India-Sri Lanka Relations: 'भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर होऊ देणार नाही', राष्ट्रपती विक्रमसिंघे यांचं मोठं वक्तव्य

पीएम मोदी ट्रुडो यांना म्हणाले...

याशिवाय, पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांना सांगितले की, संघटित गुन्हेगारी, ड्रग सिंडिकेट, मानवी तस्करी यासारख्या अतिरेकी घटकांचा संबंध कॅनडासाठी चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

Gurpatwant Singh Pannoon
कॅनडातील वाढत्या खलिस्तानी कारवायांवर PM मोदींनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

कॅनडा हा खलिस्तानी समर्थकांचा बालेकिल्ला बनल्याबद्दल भारताने ट्रुडो यांच्याकडे आपली चिंता व्यक्त केली. बैठकीत पीएम मोदींनी ट्रुडो यांचे लक्ष भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार भडकावणाऱ्या खलिस्तानी अतिरेक्यांकडे वेधले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी ट्रूडो यांना सांगितले की कॅनडातील अतिरेकी तत्व फुटीरतावाद वाढवत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खलिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याबाबत नुकतेच भाष्य केले होते.

ब्रिटनमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com