तालिबानने काबूलमधील नॉर्वेजियन दूतावास घेतलं ताब्यात

तालिबानने (Taliban) काबूलमधील नॉर्वेजियन दूतावासावर (Norwegian Embassy) कब्जा केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दूतावासातील साहित्यांची तोडफोडही केली आहे.
Taliban
TalibanTwitter/ @NorwayAmbIran

अफगाणिस्तानात (Afghanistan) सरकार स्थापन केल्यानंतर आता तालिबान (Taliban) अधिक आक्रमक होत आहे. तालिबानने काबूलमधील नॉर्वेजियन दूतावासावर कब्जा केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दूतावासातील साहित्यांची तोडफोडही केली आहे. इराणमधील नॉर्वेच्या राजदूताच्या वतीने त्यासंबंधीचा फोटो ट्विट करताना, घटनेची माहिती देण्यात आली आहे. तालिबानने दूतावासात दारूच्या बाटल्या फोडल्या आणि मुलांची पुस्तकेही नष्ट केली.

राजदूताने फोटो ट्विट केला

इराणमधील (Iran) नॉर्वेचे राजदूत सिग्वालू हॉग (Sigwalu Hogg) यांनी ट्विट करत म्हटले की, 'तालिबानने आता काबूलमधील नॉर्वेजियन दूतावास ताब्यात घेतला आहे. असे म्हटले जाऊ शकते की, आता ते या नंतर आमच्याकडे येतील. पण त्याआधी त्यांनी दूतावासातील दारूच्या बाटल्या फोडल्या आणि मुलांची पुस्तके नष्ट केली. कदाचित आता बंदुका कमी धोकादायक असतील.

Taliban
तालिबान सरकार स्थापनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया, चीन समाधानी तर जर्मनी कठोर

अफगाणिस्तानात दहशतवादी सरकार

तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये स्थापन केलेल्या सरकारचे प्रमुख हे हबीतुल्ला अखुंजदा (Habitullah Akhunjada) असणार आहेत. तालिबानच्या कट्टर अंतरिम सरकारमधील हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी हे देशाचे कार्यवाहक गृहमंत्री आहेत. याशिवाय 33 सदस्यीय सरकारमध्ये अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना स्थान देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात डेन्मार्क आणि नॉर्वेने घोषणा केली की, ते काबूलमधील आपले दूतावास बंद करत आहेत. यासह, दोन्ही देशांनी अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेले कर्मचारीही बाहेर काढले होते.

डेन्मार्क आणि नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आले

डॅनिश परराष्ट्र मंत्री जेप्पे कोफोड यांनी माध्यमांना सांगितले की, 'आम्ही काबूलमधील आमचे दूतावास तात्पुरते बंद करत आहोत.' नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्री इने सोराइड यांनीही असचं विदान केलं होतं. ते म्हणाले की, दूतावास बंद केले जात आहे आणि नॉर्वेजियन राजनयिक अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. याशिवाय स्थानिक कामगार आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांना बाहेर काढण्यात आले. नॉर्वेला काबूलमध्ये सुरु असलेली निर्वासन प्रक्रिया थांबवावी लागली.

Taliban
ताजिकिस्तानपासून पंजशीर 'डिस्कनेक्ट' जाणून घ्या, तालिबान का ठरतोय वरचढ

अफगाणिस्तानमध्ये 200 परदेशी नागरिक

तालिबानच्या वतीने 200 अमेरिकन आणि इतर परदेशी नागरिकांना देशात राहण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे लोक अजूनही अफगाणिस्तानात आहेत. खरं तर, अमेरिकन सैन्याच्या निर्गमनानंतर चार्टर उड्डाणे काबूलमधून उड्डाणे तालिबान्यांच्या हस्तक्षेपामुळे रोख ललावण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये तालिबानने काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने 124,000 परदेशी आणि धोक्यात आलेल्या अफगाण नागरिकांना बाहेर काढले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com