पाकिस्तानने अडवला भारताचा 50,000 मेट्रिक टन गहू,अफगाणिस्तानची मदत रोखली

अफगाणिस्तानात अन्नधान्य पाठवण्यासाठी भारताने गेल्या महिन्यात पाकिस्तानशी (Pakistan) संपर्क साधला. मात्र, भारताच्या या प्रस्तावाला पाकिस्तानने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
Pakistan don't reply to India for help to Afghanistan
Pakistan don't reply to India for help to Afghanistan Dainik Gomantak
Published on
Updated on

ऑगस्टमध्ये तालिबानने (Taliban) सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) अन्नधान्यासह (Food Problem In Afghanistan) अनेक मानवतावादी संकटाला तोंड देत आहे. गरिबी आणि भूकमारीमुळे अफगाणिस्तानातील संकट अधिकच धोकादायक होत चालले आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानात अन्नधान्य पाठवण्यासाठी भारताने गेल्या महिन्यात पाकिस्तानशी (Pakistan) संपर्क साधला. मात्र, भारताच्या या प्रस्तावाला पाकिस्तानने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार भारत (India) सरकारने अफगाणिस्तानसाठी मदतीचा हात पुढ केला आहे आणि ही मदत पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानात जाणार आहे आणि भारताला पाकिस्तानकडून विलंब न लावता प्रत्युत्तर अपेक्षित होते जेणेकरून लवकरात लवकर मदत पाठवली जाईल जाईल. (Pakistan don't reply to India for help to Afghanistan)

भारत सरकारने अफगाणिस्तानात 50,000 मेट्रिक टन गहू पाठवण्यासाठी ट्रकच्या हालचालींबाबत पाकिस्तानला एक प्रस्ताव पाठवला होता . मात्र, पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

अफगाणिस्तानातील लोकांसाठी मानवतावादी मदत पाठवण्याची तयारी भारताने अनेकदा व्यक्त केली आहे. तथापि, तालिबान राजवटीला मान्यता दिल्याच्या परिणामांचा विचार करण्याची सूचनाही आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला केली आहे. देशाला दुष्काळ आणि उपासमारीच्या संकटातून सोडवण्यासाठी तालिबानकडे कोणतीही ठोस योजना नाही. चीन आणि तुर्कीसह काही देशांनी गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात धान्य पाठवण्यास सुरुवात केली आहे.मात्र भारताची मदत पोहोचू शकत नाहीये. भारताने अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी रस्ता मार्ग प्रस्तावित केला, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाई मार्गाने वाहतूक करणे कठीण आहे. 50,000 मेट्रिक टन गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात नेण्यासाठी 5,000 ट्रकची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आणि भारताने तशी तयारी देखील केली आहे.

Pakistan don't reply to India for help to Afghanistan
जगातील सर्वात प्रदूषित 5 शहरे, लाहोर दुसऱ्या तर दिल्ली पहिल्या स्थानी

पाकिस्तान या प्रस्तावावर विचार करत आहे, परंतु रस्त्याने मदत पाठवण्याच्या मुद्द्यावर काही गोष्टी सोडवण्याची गरज असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. इतर पर्यायांचाही विचार सुरू आहे. याअंतर्गत वाघा-अटारी सीमेवर गहू उतरवून पाकिस्तानी ट्रकमध्ये भरावा लागेल.असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या एकूण 3900 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे 22.8 दशलक्ष लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत. सध्या देशात लोकांची उपासमार होण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे आहेत. दोन महिन्यांपूर्वी अशा अफगाणांची संख्या 14 दशलक्ष इतकी होती. संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालानुसार अन्न आणि पैशाची वेळीच व्यवस्था केली नाही तर अफगाणिस्तानची परिस्थिती भयावह होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com