Oscar Trophy: ऑस्कर पुरस्कार विकल्यानंतर पिझ्झाही विकत घेता येत नाही..! जाणून घ्या

Oscar Award 2023: असं म्हटलं जातं की, ऑस्कर पुरस्कार हा सिनेविश्वातील सर्वात मोठा सन्मान आहे, जो प्रत्येक कलाकाराला एकदा तरी मिळवण्याची इच्छा असते.
Oscars  Awards
Oscars AwardsDainik Gomantak

Oscar Award 2023: असं म्हटलं जातं की, ऑस्कर पुरस्कार हा सिनेविश्वातील सर्वात मोठा सन्मान आहे, जो प्रत्येक कलाकाराला एकदा तरी मिळवण्याची इच्छा असते, पण ज्याला हा सन्मान मिळतो तो भाग्यवान आहे.

सध्या हा सन्मान राजामौली आणि आरआरआरच्या संपूर्ण टीमला मिळाली आहे. नाटू नाटू गाणे बेस्ट ऑरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये निवडले गेले आणि हा पुरस्कारही जिंकला. म्हणजे भारताला (India) आणखी एक ऑस्कर ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीशी संबंधित काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तो 3 महिन्यांत तयार होतो

ही ऑस्कर ट्रॉफी 3 महिन्यांत बनते, होय... ती बनवण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे, त्यामुळे खूप वेळ लागतो आणि खूप पैसाही लागतो. आज, 13.5 इंच लांब आणि 8.5 पौंड वजनाची ही ट्रॉफी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

थ्रीडी प्रिंटरने बनवलेल्या या ट्रॉफीवर वॅक्स गुंडाळले आहे. जे 1600 डिग्री फॅरनहाइटवर गरम करुन लिक्विड ब्रॉन्जमध्ये रुपांतरित केले जाते, त्यानंतर ते गोल्डने लेपित केले जाते.

अशाप्रकारे एका ट्रॉफीची किंमत सुमारे 32 हजार मानली जाऊ शकते. पण जर तुम्हाला ही ट्रॉफी विकायची असेल तर तुम्हाला फक्त 1 डॉलर मिळतात.

Oscars  Awards
Michelle Yeoh Wins Oscar: मिशेल यो यांनी रचला इतिहास! ऑस्कर पटकावणारी पहिली आशियाई महिला

होय... जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक, हा पुरस्कार (Award) विकण्यास सक्त मनाई आहे. हा मान मिळाल्यानंतरही त्याच्या कुटुंबीयांना तो विकता येत नाही. पण जर कोणाला ते ठेवायचे नसेल तर ते ऑस्कर अकादमीला परत करता येईल. परंतु त्या बदल्यात फक्त $1 मिळतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com