न्यूझीलंड 2021 चे स्वागत करणारा जगातील पहिला देश

 New Zealand is the first country in the world to welcome 2021
New Zealand is the first country in the world to welcome 2021

न्यूझीलंड : 2020 ला हादरवून टाकणारा, न्यूझीलंड 2021 चे स्वागत करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या आठ तास पुढे असणाऱ्या न्यूझीलंडने भारतीय वेळेनुसार गुरुवारी दुपारी साडेचार वाजता नवीन वर्षात प्रवेश केला. करोनाचा सर्वात कमी प्रभाव असणाऱ्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो आणि फटाक्यांच्या प्रदर्शनासह नवीन वर्षात रंगला. ऑस्ट्रेलियातील सिडनीपेक्षा न्यूझीलंड सुमारे दोन तास पुढे आहे आणि कोविड 19 साथीच्या रोगानंतरही फटाके व लाईट शोसह हे नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

लेझर लाइट्सच्या माध्यमातून नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यात आला. सोबतच शहरातील सर्वात उंच मनोऱ्यावर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. कीकिस ऑकलंड हार्बर ब्रिजवर फटाक्यांच्या प्रदर्शनाचा आनंद घेऊन नविन वर्षाचे स्वागत केले. अनेक कटू आठवणींना मागे टाकत जगाने २०२१ कडे प्रवास सुरु केला आहे. आर्थिक संकटातून सावरण्याबरोबरच करोनाचे लसीकरण, जागतिक शांतता, उपासमारी अशा अनेक समस्यांवर मात मिळवण्याचं आवाहन या वर्षी जगासमोर आहे.

जगभरात नवीन वर्षाची सुरुवात सर्वात आधी टोंगा, सोमा आणि किरिबाती या लहान देशांमध्ये केली जाते. त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या मोठ्या क्षेत्रफळाच्या देशांमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, चीन, फिलिपिन्स, सिंगापूर, बांगलादेश, नेपाळ, भारत, श्रीलंका, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com