Recession In China-Germany: जगावर पुन्हा मंदीचे सावट! चीन आणि जर्मनीतून मिळतायेत संकेत

जगावर पुन्हा एकदा मंदीचे सावट घोंघावत आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीतील औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे.
Recession In China-Germany
Recession In China-GermanyDainik Gomantak

China Economy Crisis: जगावर पुन्हा एकदा मंदीचे सावट घोंघावत आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीतील औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. यासोबतच जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची (Chinese Economy) निर्यातही पुन्हा घसरली आहे.

जूननंतर जुलैमध्येही चीनच्या निर्यातीत कमालीची मोठी घट नोंदवली गेली. चीनमधील जुलै महिन्यात तीन वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे.

मंदावलेल्या जागतिक मागणीमुळे चीनच्या निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे चीनवर आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा दबाव वाढला आहे.

जूनमध्ये, चीनची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 14.5 टक्क्यांनी घसरली, जी फेब्रुवारी 2020 नंतरच्या निर्यातीतील सर्वात मोठी घट होती. चीनच्या सीमाशुल्क विभागाने मंगळवारी निर्यातीची आकडेवारी जाहीर केली.

चीनच्या (China) निर्यातीत सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये देशाची निर्यात 0.9 टक्क्यांनी घसरली आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांत चीनच्या निर्यातीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे जागतिक मागणी कमी होण्याची चिन्हे आहेत.

विशेषत: विकसित देशांमध्ये लोक जास्त खर्च करत नाहीत. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस मंदी येण्याची भीतीही वाढली आहे. जरी तज्ञ सांगत आहेत की, ती अगदी किरकोळ असू शकते. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत चीनच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घट झाली आहे.

विशेषत: चीनची अमेरिकेला (America) होणारी निर्यात 13 टक्क्यांनी घसरली आहे. अमेरिका हा चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

कोरोना काळात चीनने कडक लॉकडाऊन लागू केला होता, मात्र असे असतानाही देशाच्या निर्यातीवर फारसा परिणाम झाला नाही. गेल्या वर्षी चीनच्या जीडीपीमध्ये निर्यातीचा वाटा 17 टक्के होता.

निर्यात का कमी होत आहे

मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून चीनच्या निर्यातीत सातत्याने घट होत आहे. महागाई आणि वाढत्या व्याजदराचा जागतिक मागणीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. निर्यात कमी झाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

देशात चलनवाढीची चिन्हे दिसू लागली आहेत, त्यामुळे जपानप्रमाणे चीनही आर्थिक गर्तेत अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंगळवारच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये चीनची आयातही मागील वर्षाच्या तुलनेत 12.4 टक्क्यांनी घसरली. यावरुन देशाची देशांतर्गत मागणीही मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाची आयात यंदाच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यात मागणी वाढवण्याच्या उपायांचाही समावेश आहे. युआनचे अवमूल्यन झाल्याने चीनला एक्सपोर्टमध्ये मदत होऊ शकते.

आतापर्यंत चीनने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजना गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत युआनचे अवमूल्यन चीनच्या निर्यातीला चालना देऊ शकते आणि चीनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणू शकते.

जर्मनीचीही अडचण वाढली

दरम्यान, युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीतील औद्योगिक उत्पादन जूनमध्ये 0.5 टक्क्यांनी घसरले आहे. हे अपेक्षेपेक्षा जास्त आहे.

ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वाधिक 3.5 टक्के घसरण झाली. त्यामुळे जर्मनी पुन्हा एकदा मंदीच्या गर्तेत अडकण्याची भीती वाढली आहे. जर्मनी अलीकडेच मंदीतून बाहेर आले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत देशाचा जीडीपी गेल्या वर्षीच्या तुलनेत सपाट राहिला.

पण अलीकडच्या आकडेवारीवरुन असे दिसते की, देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेली थोडीफार सुधारणा फार काळ टिकणार नाही. याचा सर्वाधिक फटका वाहन क्षेत्राला बसला आहे.

युरोपातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी फोक्सवॅगनला चीनमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंपनीची सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, परंतु चीनमधील डिलिव्हरी पहिल्या तिमाहीत 14.5% ने कमी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com