Australian Parliament: भारतीय वंशाचे वरुण घोष बनले सिनेटर; भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ

Indian Origin Senator Varun Ghosh: भारतीय वंशाचे वरुण घोष यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Indian Origin Senator Varun Ghosh
Indian Origin Senator Varun GhoshDainik Gomantak

Australian Parliament: भारतीय वंशाचे वरुण घोष यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वरुण घोष हे ऑस्ट्रेलियन संसदेचे पहिले भारतीय वंशाचे सदस्य बनले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निवडून आल्यानंतर वरुण यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. पश्चिम ऑस्ट्रेलियाचे असलेले वरुण घोष यांची नवीन सिनेटर म्हणून निवड झाली आहे. विधान परिषदेने त्यांची फेडरल संसदेच्या सिनेटवर निवड केली आहे. वरुण घोष यांच्याबाबत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वाँग म्हणाले की, ''हे खूप खास आहे, तुम्ही आता लेबर सिनेट टीममध्ये आहात. मला विश्वास आहे की, सिनेटर वरुण घोष त्यांच्या समुदायाचा आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन लोकांचा आवाज बनतील.''

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी वरुण घोष यांचे अभिनंदन केले

दरम्यान, वरुण घोष यांची सिनेटवर निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही वरुण घोष यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, 'नवीन सिनेटर वरुण घोष यांचे स्वागत आहे, तुम्हाला टीममध्ये घेऊन मला खूप आनंद झाला.' वरुण घोष यांनी एका निवेदनात म्हटले की, ''मला चांगले शिक्षण मिळण्याचे भाग्य लाभले, उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्येकासाठी उपलब्ध असले पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे.''

Indian Origin Senator Varun Ghosh
Iran-America Tensions: ''आम्ही युद्ध सुरु करत नाही, पण...''; इराणने पुन्हा भरला अमेरिकेला दम

कोण आहेत वरुण घोष?

सिनेटर वरुण घोष हे पर्थमध्ये पेशाने वकील आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधून त्यांनी कला आणि कायद्याची पदवी घेतली. त्यांनी यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये वित्त वकील म्हणून आणि वॉशिंग्टन, डीसी येथे जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. वरुण घोष यांचा राजकीय प्रवास पर्थमधून ऑस्ट्रेलियाच्या लेबर पार्टीमध्ये सामील होऊन सुरु झाला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेव्हा ते 17 वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला आले आणि क्राइस्ट चर्च ग्रामर स्कूलमध्ये शिकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com