कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा

Indian Navy In Qatar: कतारमधील अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचार्‍यांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
Court
CourtDainik Gomantak

Indian Navy In Qatar: कतारमधील अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचार्‍यांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एका निवेदनात, MEA ने म्हटले की, "आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे की कतारच्या फर्स्ट इन्स्टन्स कोर्टाने आज अल दाहरा कंपनीच्या 8 भारतीय कर्मचार्‍यांचा (Employees) समावेश असलेल्या प्रकरणात निकाल दिला आहे.

फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत. त्याचबरोबर, आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यांयाचा धांडोळा घेत आहोत.”

MEA ने निवेदनात पुढे म्हटले की, "आम्ही या प्रकरणावर लक्ष्य ठेवून आहोत. आम्ही या प्रकरणात सर्व कायदेशीर सहाय्य देत राहू. मात्र, खटल्याच्या प्रक्रियेच्या गोपनीयतेमुळे या क्षणी आणखी कोणतीही टिप्पणी करणे योग्य होणार नाही.”

Court
Muslim Countries: ईदपूर्वी कतार-बहारीन पुन्हा एकत्र, तिसऱ्या इस्लामिक देशात सुरु झाला मैत्रीचा नवा अध्याय

इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय नौदलात विविध पदांवर काम केलेल्या या भारतीयांवर इस्रायलसाठी (Israel) हेरगिरी केल्याचा आरोप होता. एक्स्प्रेस ट्रिब्यूनचे म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेल्या भारतीयांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती दिल्याचा आरोप होता.

वृत्तानुसार, याच प्रकरणात एका खासगी संरक्षण कंपनीचे सीईओ आणि कतारच्या आंतरराष्ट्रीय लष्करी ऑपरेशन्सच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली होती. हे लोक या कंपनीत काम करत होते.

3 मे रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आल्याचा दावा वृत्तपत्राने केला होता. कतारी अधिकार्‍यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे आरोप सिद्ध होणारे पुरावे आहेत.

Court
Israeli Airstrikes: गाझा पट्टीत पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादींवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच

8 भारतीय नौदल अधिकारी

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश अशी कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

भारत सरकार काय म्हणाले होते?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, आम्ही कतारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. दोहा येथील आमचा दूतावास कुटुंबांच्या संपर्कात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com