सारखा म्हणायचा, माझ्यावर सगळ्या मुली फिदा आहेत! एक असा आजार ज्यामुळे तरूण झाला प्लेबॉय

Delusional Love Disorder: चीनमधील एका 20 वर्षीय मुलाचा असा समज झाला की, तो विद्यापीठातील सर्वात हुशार मुलगा आहे आणि सर्व मुलींना तो आवडतो.
Delusional Love Disorder
Delusional Love DisorderDainik Gomantak

Delusional Love Disorder: चीनमधून चकित करणारी घटना समोर आली आहे. चीनमधील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याचा असा समज झाला की, तो विद्यापीठातील सर्वात हुशार मुलगा आहे आणि सर्व मुलींना तो आवडतो. हा समज त्याच्या मनात इतका प्रबळ झाला की, त्याची रात्रीची झोप कमी झाली आणि त्याने पैशाची उधळपट्टी सुरु केली. मात्र, काही दिवसांनी मुली त्याला भाव देत नसल्याचे समजताच तो अस्वस्थ झाला. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले, तेथून धक्कादायक वास्तव समोर आले.

Delusional Love Disorder ने पीडित विद्यार्थी

दरम्यान, हे प्रकरण चीनच्या जिआंगसू प्रांतातील आहे. पीडित विद्यार्थ्याचे नाव लिऊ असे आहे. लिऊ विद्यापीठात द्वितीय वर्षात शिकत होता. विद्यापीठातील सगळ्या मुली त्याच्यावर फिदा आहेत असं त्याला वाटू लागलं होतं. तो याचा इतका गांभीर्याने विचार करु लागला होता की, त्याची मुलींबद्दलची वागणूक बदलली. त्याने सगळ्या मुलींवर खुलेपणाने प्रेम दाखवायला सुरुवात केली. तो स्वत:ला सर्वात हुशार मुलगा समजू लागला, ही गोष्ट त्याच्या इतकी डोक्यात गेली की त्याची झोपही उडाली. लिऊने मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. लिऊ विचार करु लागली की, लोक काय म्हणतील म्हणून मुली प्रेम व्यक्त करु शकत नाही परंतु त्या त्याला पसंत करतात. दुसरीकडे मात्र, लिऊची अवस्था पाहून त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी सांगितले की, याला 'डिल्युशनल लव्ह डिसऑर्डर' म्हणतात.

Delusional Love Disorder
India-China Relations: ''अरुणाचल प्रदेशवर भारताने बेकायदेशीर कब्जा केला, आम्ही त्याला...'' चीनने पुन्हा ओकली गरळ!

लव्ह डिसऑर्डर म्हणजे काय?

एका चिनी डॉक्टरांनी सांगितले की, हा विकार साधारणपणे मार्च ते एप्रिल दरम्यान दिसून येतो. या अवस्थेने ग्रस्त लोक हायपर होतात आणि त्यांना कमी झोप लागते आणि त्यांना सेक्स ॲडिक्शन देखील होऊ शकते. एससीएमपीच्या मते, डॉ लू म्हणाले की, "अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, असे रुग्ण चिडतात आणि लोकांवर हल्ला करु शकतात."

एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे, असे डॉक्टरांनी सांगितले. जरी लक्षणे सौम्य किंवा प्रारंभिक असली तरीही. लिऊवर औषधे आणि मानसोपचाराने उपचार केले जात आहेत. सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com