ना टेक ऑफ ना लँडिंग, यूकेमध्ये विमान प्रवास ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण यूकेमध्ये विमान प्रवास अचानक ठप्प झाला आहे. यामुळे, ना विमाने उतरु शकत आहेत ना टेक ऑफ करु शकत आहेत.
UK
UKDainik Gomantak
Published on
Updated on

तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण यूकेमध्ये विमान प्रवास अचानक ठप्प झाला आहे. यामुळे, ना विमाने उतरु शकत आहेत ना टेक ऑफ करु शकत आहेत. एका एअरलाइनने नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याची तक्रार नोंदवली. ब्रिटिश विमानतळांबाहेरील प्रवाशांना एअर ट्रॅफिक कंट्रोल नेटवर्क डाउन असल्याचे सांगण्यात आले आहे.

ट्रॅफिक फ्लो रोखण्याचे आदेश

नॅशनल एअर ट्रॅफिक कंट्रोलर, नॅट्सने सांगितले की, सध्या आम्हाला तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आम्ही ट्रॅफिक फ्लोवर रोखण्याचे आदेश दिले आहे. स्काय न्यूजनुसार, नेट्सने सांगितले की, इंजीनियर्स समस्या दूर करण्याचे काम करत आहेत. आम्ही प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

प्रवाशांच्या सोयीसाठी

Loganair ने X वर पोस्ट केली की, UK एअर ट्रॅफिक कंट्रोल नेटवर्कमध्ये आज सकाळी तांत्रिक बिघाड झाला. तथापि, आम्ही स्थानिक समन्वयाच्या आधारावर आणि कमीतकमी व्यत्ययासह बहुतेक इंट्रा-स्कॉटलंड उड्डाणे चालविण्यास सक्षम आहोत. त्यानुसार उत्तर-दक्षिण आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना विलंब होऊ शकतो. नोटीसमध्ये प्रवाशांना पुढे सांगण्यात आले आहे की, आज तुमची फ्लाइट असेल तर, विमानतळावर जाण्यापूर्वी, तुमच्या फ्लाइटबद्दल नवीन अपडेटसाठी वेबसाइट पाहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com