The Mystery Lady: ऐतिहासिक! 2,000 वर्षांहून अधिक जुन्या 'ममी'चा चेहरा पुन्हा केला तयार

ही ममी 'द मिस्ट्री लेडी' म्हणून ओळखली जाते.
The Mystery Lady
The Mystery LadyDainik Gomantak

फॉरेन्सिक शास्त्रज्ञांनी 2,000 वर्षांहून अधिक जुन्या ममीचा (Mummy) चेहरा पुन्हा तयार केला आहे. ही ममी गरोदर इजिप्शियन ममीची (Pregnant Egyptian Mummy) असल्याचे सांगितले जात आहे. शास्त्रज्ञांनी 2D आणि 3D तंत्राचा वापर करून ममीचा चेहरा तयार केला आहे. मिररने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, ही ममी 'द मिस्ट्री लेडी' (The Mystery Lady) म्हणून ओळखली जाते.

The Mystery Lady
T20 WC: 'बिलियन डॉलर लीग क्रिकेटपेक्षा पाकिस्तानी संघ उत्कृष्ट' रमीज राजाने चोळले भारताच्या जखमेवर मीठ

मिळालेल्या माहितीनुसार, ही ममी 20 ते 30 वयोगटातील असून, गर्भधारणेच्या 28 आठवड्यांत महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते. मुलाला जन्म न देता ही मृत झालेली ही ममी मानली जाते. इसवी सनपूर्व पहिल्या शतकापूर्वीच्या वर्षांत ती स्त्री जिवंत असती तर ती कशी दिसते हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी ममीची कवटी आणि शरीराच्या इतर भागांची तपासणी केली.

The Mystery Lady
Cattle Slaughtering Goa: गोवंश कत्तल! गोवा सरकार जनावरांच्या वाहतुकीवरील बंदी उठवणार

1826 मध्ये ही ममी सापडली होती आणि ती इजिप्तमधून पोलंडमधील वॉर्सा येथे नेण्यात आली होती. महिलेचा मृतदेह कापडाने गुंडाळून एका संग्रहात ठेवला होता. फेसबुकवरील वॉर्सॉ ममी प्रोजेक्टच्या एका पोस्टनुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला जतन करण्यासाठी घेतलेली काळजी म्हणजे ममीफिकेशन म्हणून ओळखले जाते. लवकरच ही ममी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com