ज्ञानाचे संपत्तीत रुपांतरण महत्वाचे - नितीन गडकरी

Transformation of knowledge into wealth is important - Nitin Gadkari
Transformation of knowledge into wealth is important - Nitin Gadkari

नवी दिल्ली, 

केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल क्षेत्राच्या महामारीनंतरच्या  वाढीबाबत चर्चा करण्यासाठी इंजिनीअरिंग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (ईईपीसी) प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

लॉकडाऊन दरम्यान अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला अल्प कालीन अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, “सकारात्मकता आणि आत्मविश्वास”  त्वरित अडचणी दूर करण्यास मदत करू शकतो, असे सुचवत त्यांनी उपस्थितांना  प्रेरित केले. अर्थव्यवस्थेतील सर्व हितधारकांमधील प्रभावी  सहकार्याने सध्याच्या महामारीच्या परिस्थितीवर मात केली जाऊ शकते यावर त्यांनी भर दिला.

या संवादादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी एमएसएमई क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले आणि देशाच्या जीडीपी, निर्यात आणि रोजगार निर्मितीत या क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, सध्या देशाच्या निर्यातीत एमएसएमई क्षेत्राचे सुमारे 48% योगदान आहे आणि तांत्रिक उन्नतीकरण आणि उत्पादन विकासाच्या माध्यमातून हे आणखी वाढवावे लागेल. याव्यतिरिक्त, ते म्हणाले की लॉजिस्टिक्स , वाहतूक आणि कामगार खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे भारतातील निर्मिती उद्योगाच्या विकासाला मदत होईल.  कोविड महामारीवर जग  हळूहळू मात करत असून देशातून निर्यातीला सहाय्य करण्यासाठी भारतातील पॅकेजिंग आणि मानकीकरणाच्या सुविधा विकसित करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, एमएसएमई मंत्रालयाने भारतीय एमएसएमईला समभाग समर्थन देण्यासाठी एक फंड ऑफ फंड तयार केला आहे. ज्या एमएसएमईची उलाढाल, जीएसटी विवरणपत्र नोंदणी आणि प्राप्तिकर नोंदणी उत्तम असेल त्यांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, मानांकन दिले जाईल आणि त्याद्वारे सरकारकडून 15% समभाग गुंतवणूक केली जाईल.  यामुळे त्यांना हळूहळू भांडवल बाजारातून पैसे उभारण्यास ,  प्रस्तावित एमएसएमई शेअर बाजारात स्वतःची नावनोंदणी करण्यास आणि परकीय गुंतवणूकीला आकर्षित करण्यास सक्षम केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com