तिस्ता सेटलवाड यांचा मुक्काम तुरुंगातच, जामीन अर्जावरील सुनावणी 15 जुलैपर्यंत पुढे ढकलली

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि निवृत्त डीजीपी बीआर श्रीकुमार यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
Teesta Setalvad
Teesta SetalvadDainik Gomantak

Teesta Setalvad: सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि निवृत्त डीजीपी बीआर श्रीकुमार यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सध्या त्यांना तुरुंगातच रात्र काढावी लागणार आहे. अहमदाबाद सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 15 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. फिर्यादी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि एसआयटीचा क्लोजर रिपोर्ट पाहण्यासाठी वेळ मागितला होता, जो न्यायालयाने मान्य केला आहे.

दरम्यान, 2002 च्या गुजरात (Gujarat) दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर तीस्ता आणि माजी डीजीपी यांना अटक करण्यात आली.

Teesta Setalvad
कोण आहेत तिस्ता सेटलवाड?, पद्मश्री परत घेण्याची केली जायेत मागणी

यापूर्वी, 6 जुलै रोजी तीस्ता सेटलवाड यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते. 2002 च्या धार्मिक दंगलीच्या संदर्भात निरपराध लोकांना अडकवण्याचा कट रचल्याबद्दल सेटलवाड आणि इतर दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांना अहमदाबाद (Ahmedabad) गुन्हे शाखेने अलीकडेच अटक केली आहे.

Teesta Setalvad
हनुमान चालीसा वाचली म्हणून विद्यार्थ्यांना MP सरकारने ठोठावला 5 हजारांचा दंड

तसेच, दुसरे आरोपी आणि गुजरातचे माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्या नियमित जामिनावर सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीडी ठक्कर यांनी राज्य सरकारला नोटीसही बजावली होती. श्रीकुमार यांनी मंगळवारी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या संबंधित जामीन अर्जांमध्ये, सेटलवाड आणि श्रीकुमार यांनी दावा केला आहे की, 'आयपीसीच्या कलमांखाली आमच्याविरुध्द कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com