Earthquake: सीरीया-तुर्कीसारखाच भारतातही येणार भूकंप

Earthquake: IIT कानपूरच्या अर्थसायंन्स ( Earth Science ) विभागाचे प्रोफेसर जावेद मलिक यांनी हे वक्तव्य केले आहे.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

Earthquake: तुर्की आणि सिरिया मधील भूकंपामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.आता भारतातही तुर्की आणि सिरियासारखा भूकंप होऊ शकतो असे भारतीय वैज्ञानिकाने भाकित केले आहे.

IIT कानपूरच्या अर्थसायंन्स ( Earth Science ) विभागाचे प्रोफेसर जावेद मलिक यांनी हे वक्तव्य केले आहे. येणाऱ्या दोन दशक किंवा त्याआधी भारतात भूकंप होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार असू शकतो त्यामुळे सावधानी बाळगणे जरुरी असल्याचे प्रोफेसर जावेद यांनी म्हटले आहे. मागच्या बऱ्याच काळापासून प्रोफेसर जावेद हे अंदमान निकोबार , कच्छ आणि उत्तराखंडच्या भागात पृथ्वीच्या बदलाचा अभ्यास करत आहेत.

प्रोफेसर जावेद यांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये एखादा भूकंप आला तर उत्तरप्रदेशपर्यत त्याचा परिणाम दिसू शकतो. 1934 मध्ये नेपाळ आणि बिहार( Bihar )मध्येआलेल्या भूकंपाचा दूरपर्यत परिणाम दिसून आला होता. ]

1803 मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचा मथुरा( Mathura )पर्यंत परिणाम दिसून आला होता.पृथ्वीच्या अंतर्भागात इंडियन आणि युरेशिअन प्लेटची टक्कर झाल्याने 2015 मध्ये नेपाळ मध्ये भूकंप झाला होता.

Earthquake
Uttarakhand: गड्या आपला गाव बरा! नोकरी सोडून गावाकडे परतले, आता कमवत आहेत लाखोत

प्रोफेसर मलिक यांनी केलेल्या अभ्यासानुसार, भूकंपच्या तरंगलहरी जेव्हा गंगेच्या प्रदेशात प्रवास करत असतात तेव्हा त्या जास्त ताकदवान होतात.

दरम्यान, तुर्की( Turkey )मध्ये मृतांची संख्या 21 हजारांवर गेली आहे. या भूकंपाने हजारो कुटुंबे उद्धवस्त केली आहेत आणि हजारो लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. यात झालेल्या जीवीतहानी संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com