Kumar Vishwas यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ, RSS अन् डाव्या पक्षांबाबत म्हणाले...

Kumar Vishwas Controversial Statement: कुमार विश्वास यांना त्यांच्या एका वक्तव्यावरुन टीकेला सामोरे जावे लागत आहे. आपल्या चर्चेदरम्यान कुमार विश्वास यांनी डावे आणि आरएसएस या दोघांचीही खिल्ली उडवली.
Kumar Vishwas
Kumar VishwasDainik Gomantak

Kumar Vishwas Controversial Statement: देशातील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास हे रामकथा करण्यासाठी उज्जैनला पोहोचले होते. यादरम्यान कुमार विश्वास यांना त्यांच्या एका वक्तव्यावरुन टीकेला सामोरे जावे लागत आहे. आपल्या चर्चेदरम्यान कुमार विश्वास यांनी डावे आणि आरएसएस या दोघांचीही खिल्ली उडवली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुमार विश्वास यांनी आरआरएसला (RSS) निरक्षर म्हटले, तर दुसरीकडे, त्यांनी डाव्या पक्षांनाही निरक्षर म्हटले. अर्थसंकल्पाबाबत (Budget) बोलताना कुमार विश्वास यांनी हे वक्तव्य केले. वाद वाढल्यानंतर कुमार विश्वास यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे.

Kumar Vishwas
Kumar Vishwas: कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी, केजरीवाल यांच्या विरोधात न बोलण्याचा इशारा

ते म्हणाले की, 'माझे बोलणे इतर काही संदर्भात गेले असेल तर मी माफी मागतो.' कुमार विश्वास यांच्या या वक्तव्याबाबत भाजपचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया म्हणाले की, 'तुम्ही कथा सांगण्यासाठी आला आहात, कथा वाचा, प्रमाणपत्र वितरित करु नका.'

काय आहे संपूर्ण प्रकरण?

विक्रमोत्सव कार्यक्रमांतर्गत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान उज्जैनमध्ये रामकथेचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी झालेल्या रामकथेदरम्यान कुमार विश्वासही उपस्थित होते. त्यांच्या मंगळवारी झालेल्या भाषणाची एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kumar Vishwas
Shelley Oberoi: कोण आहेत शैली ओबेरॉय? दिल्लीच्या नवीन महापौरांबद्दल जाणून घ्या

कुमार विश्वास म्हणाले की, अंदाजे 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा बजेट येणार होते. त्यावेळी मी माझ्या स्टुडिओत उपस्थित होतो आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलाने मोबाईल ऑन करुन सांगितले की बजेट येणार आहे, बजेट कसे असावे? तो मुलगा आरएसएसशी संबंधित होता.

यावर कुमार विश्वास म्हणाले की, तुम्ही रामराज्याचे सरकार बनवले आहे, त्यामुळे रामराज्यासारखे बजेटमध्ये आले पाहिजे. त्यावर मुलगा म्हणाला, रामराज्यात बजेट कुठे होते.

Kumar Vishwas
Delhi Mayor: अखेर एमसीडीमध्ये आपचे सरकार, शैली ओबेरॉय निवडणुकीत विजयी!

कुमार विश्वास यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ

यावर कुमार विश्वास म्हणाले की, 'डावे अशिक्षित आहेत, म्हणजेच त्यांनी जे वाचले आहे ते चुकीचे वाचले आहे. जिथे तुमच्याबद्दल बोलले जाते तिथे तुम्ही अशिक्षित आहात.'

विश्वास पुढे म्हणाले की, 'डाव्या विचारसरणीने सर्वच गोष्टींचा अभ्यास केला आहे, पण त्यांनी जो काही अभ्यास केला आहे, त्यात अनेक चुका आहेत आणि एक म्हणजे ज्यांनी अजिबात अभ्यास केलेला नाही, ते वेदांबद्दल बोलतात. पण त्याबद्दल त्यांनीही स्वतः काही वाचलेले नाही.' मात्र, नंतर कुमार विश्वास यांनी मुलाला रामराज्याच्या बजेटबद्दल समजावून सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com