Indian Wheat: पीयूष गोयल म्हणाले, 'भारतीय गहू उत्तम क्वालिटीचा'

तुर्कस्तानने (Turkey) बेताल वक्तव्यानंतर भारतीय गहू खराब असल्याचे सांगून तो परत केला.
Piyush Goyal
Piyush GoyalDainik Gomantak

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. या युध्दामुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. यातच एकीकडे जगभरातील देश मोदी सरकारकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे तुर्कस्तानने बेताल वक्तव्यानंतर भारतीय गहू खराब असल्याचे सांगून तो परत केला. 29 मे पासून 56877 टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कीतून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. भारतीय गव्हात रुबेला विषाणू आढळून आल्याचे तुर्कीने म्हटले आहे. त्यामुळे परत पाठवण्यात येत आहेत. तुर्कीचे हे पाऊल आश्चर्यकारक नाही, याआधीही तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी काश्मीर मुद्यावरुन बेताल वक्तव्ये केली आहेत. (Piyush Goyal said that the quality of Indian wheat is good)

दरम्यान, तुर्कीने (Turkey) भारतीय गव्हाची खेप न घेतल्याच्या संदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, 'तुर्कीने असे का केले त्यामागील हेतू मला माहित नाही. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, भारतातील (India) गहू चांगल्या दर्जाचा आहे. आयटीसी चांगला गहू खरेदी करते.' हा माल नेदरलँडने (Netherlands) विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Piyush Goyal
तुर्कीने भारताचा गहू का केला परत, काश्मीर मुद्यावरही ओकली गरळ

भारतीय गव्हात रुबेला विषाणूचा आरोप

तुर्कीने अलीकडेच भारतीय गव्हाची खेप परत केली. भारतीय गव्हात रुबेला विषाणू आढळून आल्याचे तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीने हे राजकीय कारणासाठी केले आहे. भारतीय कंपनी ITC ने हाच गहू नेदरलँडमधील एका कंपनीला विकला होता, ज्याने पुढे तो तुर्की कंपनीला विकला होता.

Piyush Goyal
पाकिस्तानने अडवला भारताचा 50,000 मेट्रिक टन गहू,अफगाणिस्तानची मदत रोखली

सरकारने तुर्की अधिकाऱ्यांकडून तपशील मागवला

गव्हाच्या निर्यातीबाबत अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, सरकारने तुर्कीच्या अधिकाऱ्यांकडून या मुद्द्यावर तपशील मागवला आहे. दुसरीकडे, आयटीसी लिमिटेडने दावा केला आहे की, 60,000 टनांच्या निर्यात मालाला सर्व आवश्यक मंजुरी आहेत. सचिव पुढे म्हणाले की, भारताने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर, पाच-सहा देशांनी भारतीय गहू आयात करण्याची विनंती केली होती. अशा देशांना गव्हाची निर्यात करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com