Marriage: "लग्न ठरल्यानंतरही ते न करणे याला फसवणूक म्हणाता येणार नाही" : सुप्रीम कोर्ट

Marriage Proposal: बोलणी ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. मुलीच्या वडिलांनी लग्नाचा हॉल बुक करण्यासाठी 75 हजार रुपये ॲडव्हान्सही दिले होते.
Non-marriage after proposal of marriage cannot be termed as cheating unless the intention to cheat is proved.
Non-marriage after proposal of marriage cannot be termed as cheating unless the intention to cheat is proved.Dainik Gomantak

Non-marriage after proposal of marriage cannot be termed as cheating unless the intention to cheat is proved, says Suprme Court:

फसवणूक करण्याचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर लग्न न करणे याला फसवणूक म्हणता येणार नाही. लग्नाच्या प्रस्तावानंतरही लग्न न होण्याची अनेक कारणे असू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

यावेळी याचिकाकर्ते राजू कृष्णा शेडबाळकर यांच्यावरील फसवणुकीचा खटला रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लग्नाचा प्रस्ताव देऊनही लग्न न केल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी शेडबाळकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने सांगितले की, लग्नाचा प्रस्ताव आणणे आणि नंतर हा प्रस्ताव अपेक्षित शेवटपर्यंत न पोहोचण्याची अनेक कारणे असू शकतात. फसवणूक सिद्ध करण्यासाठी विश्वसनीय पुरावे आवश्यक आहेत. याचिकाकर्त्याविरुद्ध असा कोणताही पुरावा सापडला नाही.

तक्रारीनुसार, एका मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी याचिकाकर्त्याची निवड केली होती. बोलणी ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. मुलीच्या वडिलांनी लग्नाचा हॉल बुक करण्यासाठी 75 हजार रुपये ॲडव्हान्सही दिले होते. मात्र, नंतर याचिकाकर्त्याने दुसऱ्याशी लग्न केले. त्यामुळे तरुणीने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

Non-marriage after proposal of marriage cannot be termed as cheating unless the intention to cheat is proved.
मुलांच्या आत्महत्येमागे पालकांचा दबाव, कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नियमनाचे निर्देश देऊ शकत नाही: सुप्रीम कोर्ट

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या जुलै 2021 च्या आदेशाविरुद्ध याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या अपीलवर न्यायालय सुनावणी करत होते.

कर्नाटक उच्च न्यायलयाने याचिकाकर्त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्धचा खटला रद्द केला होता परंतु त्याच्याविरुद्धचा खटला रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर याचिककर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Non-marriage after proposal of marriage cannot be termed as cheating unless the intention to cheat is proved.
पत्नीने केली पतीची सही, सुप्रीम कोर्ट म्हणाले- प्रत्येक फसवणूक बेकायदेशीर नसते

न्यायालयाने, संबंधित तरतुदी आणि कायद्यांचे परीक्षण केल्यानंतर, फसवणुकीचा गुन्हा आकर्षित करण्यासाठी, सुरुवातीपासूनच फसवणूक किंवा फसवणूक करण्याचा हेतू असणे आवश्यक आहे असे मानले.

या प्रकरणात, न्यायालयाला याचिकाकर्त्याचा असा हेतू असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यावरील फौजदारी खटला रद्द करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com