केरळमध्ये दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाची तिसरी घटना; कोझिकोडमध्ये 12 वर्षीय मुलाला लागण

Brain Eating Amoeba: केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एक मुलगा अमिबामुळे होणाऱ्या दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाने ग्रस्त आहे, या संसर्गाला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस म्हणतात.
केरळमध्ये दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाची तिसरी घटना; कोझिकोडमध्ये 12 वर्षीय मुलाला लागण
Brain Eating AmoebaDainik Gomantak

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एक मुलगा अमिबामुळे होणाऱ्या दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाने ग्रस्त आहे, या संसर्गाला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस म्हणतात.

या प्रकरणाची माहिती केरळमधील एका खासगी हॉस्पिटलने दिली असून, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला बेबी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाची ही तिसरी घटना आहे. सोमवारी (24 जून रोजी) मुलाला बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी संसर्ग ओळखला आणि तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्राणघातक अमिबा खराब पाण्यात आढळतो.

परिस्थिती अत्यंत गंभीर असून, उपचार सुरु आहेत

मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 95 ते 100 टक्के आहे. या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, आजाराची लवकरच ओळख पटली आणि त्यावर उपचारही तातडीने सुरु करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये (Hospital) या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे आहेत.

केरळमध्ये दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाची तिसरी घटना; कोझिकोडमध्ये 12 वर्षीय मुलाला लागण
Kerala New Name: केरळ नव्हे आता 'केरळम', राज्याचे नाव बदलण्यासाठी विधानसभेत ठराव मंजूर

ही तिसरी घटना आहे, आधीच 2 मृत्यू

या आजारामुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याची पहिली केस मलप्पुरममधील 5 वर्षीय मुलीमध्ये दिसली, तिचा 21 मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर, या संसर्गामुळे दुसरा मृत्यू कन्नूरमधील 13 वर्षीय मुलीचा 25 जून रोजी झाला.

हा आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. हा रोग यापूर्वी 2023 आणि 2017 मध्ये अलाप्पुझा जिल्ह्यात दिसून आला होता. या आजाराची लक्षणे अतिशय सामान्य आहेत, यामध्ये व्यक्तीला ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे असा त्रास होतो. हा अमिबा नाक आणि कानातून पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com