Kalamassery Blasts: दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अलर्ट जारी; सुरक्षा व्यवस्था वाढवली

Kalamassery Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथील चर्चमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर देशभरातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Kalamassery Blasts
Kalamassery BlastsDainik Gomantak

Kalamassery Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथील चर्चमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर देशभरातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेषतः ज्यू लोक राहत असलेल्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यातच आता, दिल्ली पोलिसांनी देखील राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकारी गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगत आहेत. दिल्ली पोलीस स्पेशल सेल गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात आहे.

एर्नाकुलम येथील ख्रिश्चन कन्व्हेन्शनमध्ये सकाळी 9 च्या प्रार्थनेच्या वेळी लागोपाठ तीन स्फोट झाले. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ एनआयए आणि एनएसजी पथके केरळकडे रवाना केली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे (Pune) यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. दरम्यान, डीजीपी शंकर जिवाल यांनी तामिळनाडूच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे.

Kalamassery Blasts
Kerala Serial Blast Case: केरळ साखळी बॉम्बस्फोटमागे हमासचा हात? घटनास्थळी NIA दाखल

प्रार्थना सभेत 2000 लोक उपस्थित होते, त्यानंतर स्फोट सुरु झाले

रविवारी म्हणजेच आज प्रार्थना सभेदरम्यान एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले.

वृत्तानुसार, प्रार्थना सभा सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तीन स्फोट झाले. ही घटना कोचीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या कलामासेरीमध्ये घडली. स्फोटावेळी झालेल्या प्रार्थना सभेत 2 हजार लोक सहभागी झाले होते. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उपस्थित लोकांनी माध्यमांना सांगितले की, पहिला स्फोट प्रार्थनेच्या वेळी झाला.

केरळचे (Kerala) पोलीस महासंचालक शेख दरवेश साहिब यांनी आयईडी वापरल्याची पुष्टी केली. स्फोटांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या स्फोटांमध्ये कमी तीव्रतेच्या स्फोटकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Kalamassery Blasts
Kerala मध्ये Hamas ची एन्ट्री, पॅलेस्टाईन समर्थक रॅलीत हमासचा म्होरक्या सहभागी; भाजप आक्रमक

दुसरीकडे, ही घटना सकाळी 9:40 वाजता चर्चमध्ये घडली, ज्यामध्ये सुमारे 2,500 लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे, एक दिवस आधी (शनिवारी) हमासचा म्होरक्या खालिद मशाल केरळमधील मलप्पुरममध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. खालिद व्हर्चुअली कार्यक्रमात सहभागी झाला होता. यामध्ये त्याने भाषण देखील दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com