India Population: लोकसंखेच्या बाबतीत भारताने चीनला टाकले मागे; बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

भारताने लोकसंखेच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे.
China Population
China PopulationDainik Gomantak
Published on
Updated on

भारताने लोकसंखेच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. ही वाढती लोकसंख्या पाहता मोदी सरकारला जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी लागणार आहे. (India become most populated country in the world)

या सोबतच विकासाचा वेग देखील भारताला वाढवावा लागणार आहे. वर्ल्ड पॉपुलेशन रिव्हू या संस्थेने या बाबत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरुन भारत हा जगभरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.

या संस्थेनुसार भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.417 बिलियन म्हणजेच 140 कोटी पेक्षा जास्त झाली आहे.

भारताची लोकसंख्या चीन देशापेक्षा 50 लाखांनी जास्त आहे. चीनने मंगळवारी त्यांची लोकसंख्या ही 1.412 बिलियन एवढी होती. चीनची लोकसंख्या ही पहिल्यांदाच 1961 नंतर कमी झाली आहे. भारताची लोकसंख्या ही 30 वर्षांपेक्षा कमी आहे.

या अहवालानुसार पुढील काही वर्षात भारत जगातील वेगवान विकास करणारा देश होणार आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था देखील सर्वात मोठी होणार आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला रोजगार देण्याचे मोठे आव्हान सरकार पुढे राहणार आहे.

या पूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने भारताबाबत वेगळा अनुमान लावला होता. या वर्षांच्या शेवटी भारत चीनला लोकसंख्येबाबत मागे टाकेल असा अंदाज होता. मात्र, या वर्षांच्या सुरवातीलाच भाराताने लोकसंख्येच्या बाबतील मागे टाकले आहे.

संयुक्त राष्ट्र महासंघाने दिलेल्या अहवालानुसार 2050 प्यारणत भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.668 अरब होण्याची शक्यता आहे. ही लोकसंख्या चीन पेक्षा सर्वाधिक राहणार आहे.

China Population
New Parliament: नव्या संसदेचं लोकसभा सभागृह तयार, मोदी सरकार मांडणार अर्थसंकल्प?

डब्लुपीआरने दिलेल्या अहवालानुसार 18 जानेवारी पर्यन्त भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.423अरब झाली आहे. तर डब्लुपीआर सोबथ रिसर्च प्लॅटफॉर्म मेक्रोट्रेंडस नुसार भारताची लोकसंख्या ही आता 1.428 एवढी आहे.

कोरोनामुळे भारताने लोकसंख्या मोजणी ही थांबवली होती. भारत २०२१ मध्ये जनगणना करणार होता. वाढत्या लोकसंख्येसोबतच भारत हा सर्वाधिक तरुण असलेला देश होणार आहे.

देशातील तरुणांना रोजगार देण्याचे मोठे आव्हान हे मोदी सरकार पुढे राहणार आहे. दरवर्षी लाखो रोजगार निर्मिती सरकारला करावे लागणार आहे. हे शिवधनुष्य सरकार कसे उचलणार हे पहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com