IMD Alert: येत्या तीन दिवस 'या' राज्यांमध्ये बरसणार मुसळधार सरी, हवामान खात्याचा इशारा

IMD Heavy Rainfall Alert: देशभरात बहुतांश ठिकाणी थंडीने दार ठोठावले आहे. अर्धा नोव्हेंबर उलटून गेला तरी अनेक राज्यांमध्ये पाऊस थांबलेला नाही.
Rainfall
RainfallDainik Gomantak

IMD Heavy Rainfall Alert: देशभरात बहुतांश ठिकाणी थंडीने दार ठोठावले आहे. अर्धा नोव्हेंबर उलटून गेला तरी अनेक राज्यांमध्ये पाऊस थांबलेला नाही. ताज्या अंदाजानुसार, हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात एक नव्हे तर दोन चक्री वादळे निर्माण झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

दरम्यान, हवामान खात्याचे म्हणणे आहे की पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू-काश्मीरच्या उत्तर भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीतील हवामानावर सतत लक्ष ठेवणारे IMD शास्त्रज्ञ सोमन सेन यांनी सांगितले की, देशाच्या अनेक भागांमध्ये दोन चक्री वादळांचा धोका निर्माण झाला आहे.

यापैकी एक पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या (Odisha) किनारी भागाकडे सरकत आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटर असू शकतो.

Rainfall
IMD Rainfall Alert: येत्या चार दिवसात 'या' राज्यांमध्ये बरसणार सरी, हवामान खात्याने दिला अलर्ट!

त्याचवेळी, दुसरे चक्रीवादळ वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, जे उत्तरेला प्रभावित करु शकते. चक्रीवादळामुळे 17 नोव्हेंबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेषत: पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rainfall
IMD Rainfall Alert: आली आनंदाची बातमी! येत्या 5 दिवसांत बरसणार मुसळधार सरी, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट!

दुसरीकडे, सोमा सेन म्हणाले की, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. वाऱ्याचा हा वेग चक्रीवादळाचे रुप धारण करु शकतो. ईशान्येकडून हे वारे उत्तरेकडे सरकण्याचीही शक्यता आहे.

सेन पुढे म्हणाले की, वादळामुळे 15, 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी पूर्व भारत आणि ईशान्य भारताच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. विशेषत: पश्चिम बंगालच्या (West Bengal) दक्षिणेकडील जिल्हे आणि ओडिशाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

इथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील जवळ येत आहे, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि हलका पाऊस होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com