Gyanvapi Masjid: ज्ञानवापीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, पुढील आदेश येईपर्यंत संरक्षण कायम

Gyanvapi Masjid: न्यायालयाने यापूर्वी 12 नोव्हेंबरपर्यंत वजुखानाला संरक्षण देण्याचे आदेश दिले होते.
Gyanvapi Masjid
Gyanvapi MasjidDainik Gomantak

Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत वजुखानाचे संरक्षण कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत संरक्षण देण्याचे आदेश दिले होते, त्याची मुदत शनिवारी संपत होती. अशा स्थितीत शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयाने त्यात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय खंडपीठाकडे हे संरक्षण सुरु ठेवण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने 17 मे चा आपला आदेश कायम ठेवला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 17 मे रोजी ज्ञानवापीमध्ये ज्या वजुखानामध्ये शिवलिंग सापडले होते, ते जतन करण्याचे आदेश दिले होते. सध्या, केंद्रीय दले तिथे तैनात आहेत. त्याचे संरक्षण केले जात आहे, जेणेकरुन त्याच्याशी कोणतीही छेडछाड होऊ नये आणि यथास्थिती राखली जाईल.

Gyanvapi Masjid
Gyanvapi Case: जिल्हा न्यायाधीशांचा मोठा निर्णय, 'शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही'

तसेच, हिंदू (Hindu) पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, "पुढील आदेशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने आम्हाला तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com