काँग्रेस, बीआरएस एकाच नाण्याच्या दोन बाजू, भाजपला संधी द्या; तेलंगणातील जनतेला CM सावंत यांचे आवाहन

राज्यातील तरुण, महिला आणि शेतकरी यांना फक्त भाजपच न्याय देऊ शकते - सावंत
Goa CM Pramod Sawant In Telangana
Goa CM Pramod Sawant In Telangana

Goa CM Pramod Sawant In Telangana: काँग्रेस आणि बीआरएस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. भाजपला तेलंगणमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी देण्याचे आवाहन जनतेला केले.

राज्यातील तरुण, महिला आणि शेतकरी यांना फक्त भाजपच न्याय देऊ शकते, असेही सावंत म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात आहेत, येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना बोलताना काँग्रेस आणि बीआरएसवर टीका केली.

राज्यात भाजपची सत्ता आल्यास तेलंगणाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या 1,200 तरुणांच्या बलिदानाची दखल घेतली जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली जाईल. त्यांच्या मृत्यूला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, कोणताही रक्तपात न होता भाजपने तीन राज्यांची स्थापना केली, असेही सावंत यावेळी म्हणाले.

सावंत यांनी 'नीलू, निधुलू, निगमलू' या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बीआरएस सरकारवर टीका केली ज्यासाठी लोकांनी आंदोलन केले आणि ही आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यांनी बीआरएसचे वर्णन भ्रष्टाचार, कमिशनरिंग आणि जातीय दंगलींचे प्रतीक आहे.

कलेश्वरम प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सावंत यांनी म्हटले. सरकार 17 परीक्षा घेऊनही भरती पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, हा तेलंगणातील तरुण आणि बेरोजगार लोकांवर अन्याय असल्याचे सावंत यांनी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com