Ganesh Visarjan 2022: यूपी-हरियाणामध्ये 4 मुलांसह 11 जणांचा बुडून मृत्यू

चार जणांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगडमध्ये सुमारे सात फूट मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होती.
drown
drownDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Visarjan 2022: दहा दिवस बाप्पांचा जल्लोश देशात बघायला मिळाला. मात्र हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये काल शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून चार मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेकांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात कालव्यात बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सोनीपत जिल्ह्यात मूर्ती विसर्जनाच्या वेळी यमुना नदीत दोन तरुण वाहून गेले. यूपीच्या उन्नाव आणि संत कबीर नगरमध्ये 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

महेंद्रगडमधील घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ अशोक कुमार यांनी सांगितले की, चार जणांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगडमध्ये सुमारे सात फूट मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होती. यादरम्यान पाण्याच्या जोरदार प्रवाहात 9 तरुण वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेऊन बचावकार्य हाती घेतले. बचाव मोहिमेदरम्यान चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर इतरांना वाचवण्यात यश आले. बचावलेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

drown
Kashmir खोऱ्यात टार्गेट किलिंगला लागणार ब्रेक, सुरक्षा एजन्सींनी आखला प्लॅन

संत कबीर नगरमध्ये 4 मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात मूर्ती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा अमी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना खलीलाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर काथार गावातील आहे. पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिस अधीक्षक सोनम कुमार यांनी सांगितले की, पूफिया (6), अजित (6), रुबी (8) आणि दीपाली (11) ही चार मुले विसर्जन पाहण्यासाठी गेली होती.

drown
"तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष होणार का...?" राहुल गांधींनी स्पष्टच सांगितले

उन्नावमध्ये दोन अल्पवयीन मुलांसह 3 ठार

यूपीच्या उन्नाव जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या वेळी गंगा नदीत वाहून गेल्याने दोन अल्पवयीन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सफीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील परियार गावातील आहे. उपविभागीय दंडाधिकारी (सदर) अंकित शुक्ला यांनी सांगितले की, नदीवर गेलेल्या माखी गावातील अल्पवयीनांसह पाच जण जोरदार प्रवाहाने वाहून गेले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना वाचवले, मात्र लवकेश सिंग (18), प्रशांत सिंग (16) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा विशाल (15) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com