PM Modi Against Speech: 'मोदींना मारुन टाका' म्हणणाऱ्या कॉंग्रेस नेत्याविरोधात कोर्टाचा आदेश; 'न्यायाधीश म्हणाले...'

Court: सोमवारी कोटा येथील न्यायालयाने पोलिसांना रंधावा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
 Sukhjinder Randhawa & Prime Minister Narendra Modi
Sukhjinder Randhawa & Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजस्थान काँग्रेस कमिटीचे प्रभारी आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोमवारी कोटा येथील न्यायालयाने पोलिसांना रंधावा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, मार्च महिन्यात महावीर नगर पोलीस (Police) ठाण्यात रंधावा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता.

त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आदेश क्रमांक 6 मध्ये काँग्रेस प्रभारी रंधावा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सोमवारी सुनावणी करताना न्यायालयाने महावीर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

 Sukhjinder Randhawa & Prime Minister Narendra Modi
Karnataka Election Result 2023: मोदींच्या 'मिशन साऊथ' ला मोठा धक्का, 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक?

दुसरीकडे, 13 मार्च रोजी राजभवन घेरावानंतर सुखजिंदर रंधावा यांनी वादग्रस्त भाषण केले होते. देश वाचवण्यासाठी मोदींना संपवण्याची भाषा त्यांनी केली होती.

रंधावा म्हणाले होते की, 'तुमची लढाई संपवा, मोदींना संपवण्याची चर्चा करा. मोदी संपले तर भारताचा उद्धार होईल. मोदी राहिले तर भारत संपेल.'

मात्र, नंतर राजकीयदृष्ट्या संपवण्याबाबत बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. रंधावा यांच्या भाषणानंतर आमदार मदन दिलावर यांच्यासह कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांनी महावीर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आमदार दिलावर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले होते.

दुसरीकडे, 10 मे रोजी न्यायालयाने एसपी शरद चौधरी यांच्याकडून इस्तागासाच्या सादरीकरणानंतर अहवाल मागवला होता.

न्यायालयात सादर केलेल्या अहवालात असे सांगण्यात आले होते की, राज्याचे प्रभारी रंधावा यांनी जयपूरमध्ये भाषण केले होते.

 Sukhjinder Randhawa & Prime Minister Narendra Modi
Karnataka Election Result 2023: कर्नाटकात 'हे' मुद्दे ठरले गेमचेंजर, भाजपच्या सत्तेला मोठा सुरुंग; काँग्रेसचा बहुमतासह दणदणीत विजय

अशा भाषणामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात: न्यायालय

या खटल्यातील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हे भाषण जयपूरमध्ये झाल्याचे सांगितले. त्याचा परिणाम कोटा तसेच संपूर्ण देशभरात जाणवला होता.

त्याचवेळी, दिलावर यांचे वकील मनोज पुरी म्हणाले होते की, 'रंधावा यांनी देशाच्या पंतप्रधानांविरोधात द्वेषपूर्ण भाषण केले. पंतप्रधान मोदींविरोधात भडकावण्याचा, त्यांच्या हत्येसाठी प्रवृत्त करण्याचा, देशाची एकता आणि अखंडता बिघडवण्याचा आणि लोकांमध्ये द्वेष आणि हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला होता.

जो भारतीय दंड संहितेच्या कलम 153B, 124A, 295A, 504, 506, 511 IPC अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.'

रंधावा यांनी भाषणादरम्यान म्हणाले...

विशेष म्हणजे, 13 मार्च रोजी जयपूरमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाने सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी भाषण केले होते, त्यात ते म्हणाले होते की, 'एकजूट राहून मोदींना संपवा. मोदी संपले तर देश वाचेल. पण मोदी राहिले तर देश उद्ध्वस्त होईल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com