Aparna Thakur’s claim about Ravi Kishan
Aparna Thakur’s claim about Ravi KishanDainik Gomantak

Ravi Kishan: प्रसिद्ध अभिनेते रविकिशन यांची पत्नी असल्याचा महिलेचा दावा; म्हणाली- ''माझ्या मुलीला स्वीकारा, अन्यथा...''

Aparna Thakur’s claim about Ravi Kishan: रविकिशन यांच्याबाबत एक महिलेने मोठा दावा केला आहे. अपर्णा ठाकूर असे या महिलेचे नाव आहे.

Aparna Thakur’s Claim About Ravi Kishan: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजप पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत येण्याची तयारी करत आहे. पण भाजपचे नेते वादग्रस्त वक्तव्य करुन राळ उडवून देत आहेत. यातच, भाजप खासदार आणि भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा रविकिशन हे ही मागे नाहीत. रविकिशन यांच्याबाबत एका महिलेने मोठा दावा केला आहे. अपर्णा ठाकूर असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी आपण रविकिशन शुक्ला यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रविकिशन आपली मुलगी स्वीकारण्यास नकार देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अपर्णा ठाकूर यांनी आज (सोमवारी) लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत घेत रविकिशन यांची पत्नी असल्याचा दावा केला. रविकिशन यांनी आपल्या मुलीचा स्वीकार केला पाहिजे अशी मागणी अपर्ण ठाकूर यांनी केली आहे.

Aparna Thakur’s claim about Ravi Kishan
CBI Case: 1200 कोटींचे Electoral Bond खरेदी करणाऱ्या कंपनीवर CBI कडून गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहेत आरोप

अपर्णा यांनी पुढे सांगितले की, ''ते आपल्या मुलीला (शेनोवा) स्वीकारतात. पण सर्वांसमोर स्वीकारण्यास ते नकार देतात. त्यांनी माझ्या घरच्यांसमोर माझ्याशी लग्न केले. मी जेव्हाही त्यांच्यासोबत राहायचे तेव्हा कुंकू (सिंदूर) लावायचे. त्यांच्यासोबत माझेही अनेक फोटो आहेत. आमचे लग्न 1996 मध्ये झाले होते. मात्र आजपर्यंत रवीकिशन यांनी आम्हाला थोडीही मदत केली नाही.''

अपर्णा यांनी पुढे सांगितले की, ''ते आपल्या मुलीला (शेनोव्हा) स्वीकारतात. पण ते सर्वांसमोर स्वीकारण्यास नकार देतात. त्यांनी माझ्या घरच्यांसमोर माझ्याशी लग्न केले. मी जेव्हाही त्यांच्यासोबत राहायचे तेव्हा कुंकू (सिंदूर) लावायचे. त्यांच्यासोबत माझेही अनेक फोटो आहेत. आमचे लग्न 1996 मध्ये झाले. मात्र आजपर्यंत रवीकिशन यांनी आम्हाला थोडीही मदत केली नाही.''

पत्रकार परिषदेत बोलताना मुलगी (शेनोवा) म्हणाली की, "मी 15 वर्षांची असताना मला कळलं की रवीकिशन हे माझे वडील आहेत ...पूर्वी मी त्यांना काका म्हणायचे. माझ्या वाढदिवसाला ते आमच्या घरी यायचे. त्यांनी मला आपली मुलगी म्हणून स्वीकारावे म्हणूनच आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com