नवपुरोगामींसाठी लेखनकौशल्याचे धडे

अधोमुखातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य असलेले साहित्य ऊर्ध्वमुखातून अथवा दत्ता नायकांच्या हस्तकौशल्यातून लेखणीवाटे बाहेर पडणे व त्याचा सुगंध सर्वत्र दरवळणे, हे आम्हा नवपुरोगाम्यांचे भाग्यच म्हटले पाहिजे. अधोमुखातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य असलेले साहित्य ऊर्ध्वमुखातून अथवा दत्ता नायकांच्या हस्तकौशल्यातून लेखणीवाटे बाहेर पडणे व त्याचा सुगंध सर्वत्र दरवळणे, हे आम्हा नवपुरोगाम्यांचे भाग्यच म्हटले पाहिजे.
goa
goaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

धार्मिक कट्टरतेला, ध्रुवीकरणाला २०१४पासून आलेले ‘अच्छे दिन’ व दीन होत चाललेले पुरोगामी विचार यामुळे माझ्यासारख्या नवपुरोगाम्यांच्या डोळ्याला डोळा लागेनासा झाला आहे.

तशातच अंधूक दिसू लागलेल्या या स्वत:च्या सख्ख्या डोळ्यांनी रविवारी दत्ता नायकांचा लेख वाचला आणि माझ्या आशा पल्लवीत झाल्या.

‘वेध’ पुरवणीत त्यांनी घेतलेला शिवशंकराचा वेध तर खुद्द त्या शंकराला स्वत:चा तृतीय नेत्र उघडूनही जमला नसता याविषयी मला तिळमात्र शंका नाही. वस्तुपाठ असलेला हा लेख होतकरू, नवपुरोगामी लेखकांनी अगदी मनोभावे कंठस्थ करावा, असा माझा आग्रह आहे.

पुरोगामी लेखनशैली आत्मसात करण्यासाठी लागणारे सगळे कौशल्य या लेखात ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे, या लेखाच्या आधारे आपण पुरोगामी लेखनशैली समजावून घेऊ. पुरोगामी लेखन करण्यासाठी निर्भीड असणे क्रमप्राप्त आहे. अजिबात घाबरायचे नाही. ज्याप्रमाणे प्रतिगामी हे वेदप्रामाण्य मानतात तसेच आपण आपले म्हणणे हेच प्रमाण मानावे.

त्यामुळे, आपल्या म्हणण्याला कुठलाच संदर्भ, पुरावा देण्याची गरज नसते, हे ध्यानात ठेवावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाची गोष्ट दुसर्‍याच्या नावावर खपवता येण्याची क्षमता. आता याच लेखात पाहा; सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई’मध्ये रात्र अठ्ठाविसावी या कथेत देवळात मुले म्हणत असलेले, ‘सांब सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे’ हे बोल शेतकर्‍यांच्या तोंडी घालण्यातले कसब फारच वाखाणण्याजोगे आहे.

इथे मुले शंकराला आळवतात असे म्हटल्यास सत्ता विरुद्ध शेतकरी म्हणजे शोषक विरुद्ध शोषित असा संघर्ष प्रस्थापित होत नाही. ग्रामीण भागांत पाऊस पडायला हवा म्हणून बेडकाचे, गाढवाचे लग्न लावण्याची परंपरा आहे. पण, ते सांगितले तर वैज्ञानिक दृष्टिकोनाला बाधा येते, म्हणून ते टाळले गेले आहे.

कशाला ‘परंपरा’ म्हणायचे व कशाला ‘प्रथा’ म्हणायचे हे समजले पाहिजे. ज्यावर सकारात्मक लिहायचे आहे ती परंपरा व जिच्यावर नकारात्मक लिहायचे आहे, टीका करायची आहे ती प्रथा. उदाहरणच द्यायचे तर लग्न होणे ही परंपरा आहे आणि विधवा होणे ही प्रथा आहे. ‘बहुजन’ आणि ‘बहुसंख्य’ यातील सूक्ष्म फरकही लक्षांत घेणे अनिवार्य आहे.

केवळ सामाजिक भिन्नत्व, भेदाभेद, उतरंड पुढे करून आपले पुरोगामित्व सिद्ध होत नाही. त्यासाठी देवांच्या कासोट्याला हात घालण्याची कसोटी पार पाडावी लागते. आपण प्रचंड नास्तिक असलो - म्हणज़े पुरोगामी नास्तिक असणे हे अ‍ॅडेड क्वालिफिकेशन आहे - तरी वाद घालताना देवाला विसरून चालत नाही.

goa
Goa Viral Post: बाबाजी का ठुल्लू! दक्षिण गोवा उमेदवारीवरुन आप, काँग्रेसची टीका; भाजपचाही पलटवार

देवांमध्येही मानवांप्रमाणे सामाजिक विभागणी करणे जमले पाहिजे. सगळे देव एकमेकांविरुद्ध उभे आडवे करता येणे हे सिद्धहस्त पुरोगामी लेखकाचे लक्षण आहे. शंकर बहुजनांचा व त्याचाच मुलगा गणपती हा ब्राह्मणांचा असा भेद उलगडून दाखवणेही मुरलेल्या पुरोगाम्याचे लक्षण आहे.

सोयीनुसार निवडलेला देव कसा चांगला व अन्य देवांना कुणीही विचारत नाही असे मत मांडायचे. हा सांब सदाशिव नुसताच देव म्हणून त्याचा लेखासाठी वापर करणे हे नवशिक्या पुरोगाम्याचे काम झाले. कुठल्या तरी शोषित, वंचित सामाजिक घटकाने सांब सदाशिवाची पाठराखण करून एखादा पंथ काढला असणे गरजेचे असते. तो पंथ कुठलाही काढो, आपल्या सोयीचा असेल तोवर त्यावरून चालायचे. फार खोलात शिरायचे नाही, हे धोरण स्वीकारावे.

पुरोगामी असणे म्हणजे आपण कशा कशाला विरोध करू शकतो व कशा कशाला करू शकत नाही याची व्याप्ती व मर्यादा लक्षांत घेणे या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानुसार त्याची विभागणी करायची. ‘स्त्रीवर अन्याय’ हा मुद्दा असेल तर इतर धर्मांत घुसायचेच नाही, फक्त रामाला समोर करायचे. लंपटपणाला विरोध करायचा असेल, तर कृष्णाशिवाय अन्य पर्यायच नाही.

कुणी आलेच त्याबद्दल विचारायला तर ‘हिंदू-मुस्लीम करू नका’ आणि ‘हिंदू-ख्रिश्चन करू नका’ नामक दोन प्रभावी, सेक्युलर शस्त्रे फेकून मारायची. समोरचा कोसळलाच म्हणून समजा! अगदीच आपला ‘सर्वदेवसमभाव’ दाखवायचाच असेल तर बुद्ध चालेल. तोही जपून व बुद्धीचा विनियोग करून वापरावा.

इतर धर्मांतील देवांच्या भानगडीत पडू नये, अन्यथा तुमचे पुरोगामित्व अगदी खालून वरपर्यंत फाटलेच म्हणून समजा. किमान असा पुरोगामी गळा काढल्यास, तो गळा कापलाही जाऊ शकतो. हा सावधानतेचा इशारा होतकरू पुरोगाम्यांनी गाठीला घट्ट बांधून ठेवावा आणि मगच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचे अमर्याद स्वातंत्र्य अनुभवावे.

समता, समानता याविषयी लेखनात काही आले नाही तर पुरोगामित्व सिद्ध होणे कठीण आहे. सामाजिक समता व समानता न मानणारे देव कुठले, हे हुडकून काढावेत. इथे लक्ष देण्यासारखे महत्त्वाचे काही तरी होतकरू पुरोगामींसाठी आहे जे लक्षपूर्वक वाचावे.

समतेचा वापर असमता कशी पसरेल व समानतेचा पुरस्कार असमानता कशी वाढेल, यासाठी कटाक्षाने करावा. जातिभेदाविरुद्ध लिहिताना आपण स्वत: जात्यांधपणा अजिबात सोडून उपयोगी नाही. ‘जातिभेद ही समाजाला लागलेली कीड आहे’, हा विचार एका विशिष्ट जातीवर हल्ला करण्यासाठीच वापरावा. त्याप्रमाणे मग देवांची सामाजिक विभागणी करणे सोपे जाते.

हराला हरीहर करताना विष्णू, शंकर यात भेद करता येणे, त्यांच्यात उच्चनीच करणे हे कौशल्य आहे. दत्ता नायकांच्या लेखात हे वैशिष्ट्य आपणास जाणवेल.

पुरोगामी लेखनाचा भाषिक दृष्टीनेही विचार करणे नवपुरोगामींसाठी गरजेचे आहे. याच लेखात पाहा; एरव्ही पर्याय उपलब्ध असतानाही मराठी लेखात कोकणी शब्द हटकून वापरणारे नायक, ‘पुरुषाचे लिंग’ याला कोकणी शब्द वापरत नाहीत. आपण पुरोगामी असलो तरी असभ्यतेच्या मर्यादा पाळणे गरजेचे आहे, ते असे!

आता शिवाचे लिंग आणि पुरुषाचे लिंग एकच करताना, लिंगायत गळ्यात नेमके काय बांधत असतील याचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. संस्कृत भाषेत ‘लिंग’ या शब्दाचा अर्थ खूण असा आहे तर मराठीत प्रजोत्पादक अवयव असा आहे, हे अजिबात लक्षांत घ्यायचे नाही.

मानवांपासून देवांपर्यंत पोहोचलेली विभागणी संतांपर्यंत पोहोचली नाही तर तो संतांवर केलेला पुरोगामी अन्याय ठरेल. बसवेश्वरही शोषित आणि ज्ञानेश्वरही ब्राह्मण असले तरी ब्राह्मणांकडूनच शोषित; मग कसे करायचे हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर त्याचेही निरसन या लेखात दत्ता नायकांनी केले आहे.

बसवेश्वरांचा लिंगायत जातीधर्म मानत नाही हे ठळकपणे सांगताना ज्ञानेश्वर ज्या पंथाचे आहेत, तोही वारकरी, वैष्णव पंथ जातीधर्म मानीत नाही हे सांगणे त्यांनी टाळले आहे, हे लक्षांत घ्यावे. काय ओवाळावे आणि काय टाळावे याची समज हे पुरोगामी लेखनाचे वैशिष्ट्य आहे. परमपूज्य डॉ. बालाजी तांबे यांनी गीतेचे विवेचन करताना, ‘भगवद्गीता स्त्रीशूद्रांना नीच ठरवते’ हे सांगायचे राहून गेले होते.

ती कमतरता या लेखात दत्ता नायकांनी भरून काढली आहे. हेही पुरोगामी लेखनाचे कसब आहे. काहीतरी भर टाकल्याशिवाय पुरोगामी लेखन पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वरांनी कितीही वेद वदवला असला तरी अजून बरेच जण शिल्लक आहेत, हेच नायकांनी स्वत: स्वप्रमाण सिद्ध केले आहे. त्यामुळे, माझ्यासारख्या नवपुरोगाम्यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

त्यांनी लेखाचा केलेला शेवट तर विशेष अभ्यासनीय आहे. इतर पुरोगामी लेखक ब्राह्मणांवर टीका करायची असते, तेव्हा ‘ब्राह्मण्य’, असा शब्द वापरतात. पण, दत्ता नायक त्याआड लपले नाहीत. त्यांनी थेट लिहिले, ‘ब्राह्मणांनी शिवाचे विकृत ब्राह्मणीकरण केले.’ असे थेट व निर्भीड असणे होतकरू पुरोगाम्यांनी शिकले पाहिजे.

अधोमुखातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य असलेले साहित्य ऊर्ध्वमुखातून अथवा दत्ता नायकांच्या हस्तकौशल्यातून लेखणीवाटे बाहेर पडणे व त्याचा सुगंध सर्वत्र दरवळणे, हे आम्हा नवपुरोगाम्यांचे भाग्यच म्हटले पाहिजे. जातीचा गुण काही केल्या जात नाही, या उक्तीप्रमाणे दत्ता नायकांची शब्दसुमनांनी बांधलेली ही पूजा, तो सांब सदाशिव फलश्रुत करो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना!

मानवांपासून देवांपर्यंत पोहोचलेली विभागणी संतांपर्यंत पोहोचली नाही तर तो संतांवर केलेला पुरोगामी अन्याय ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com