आम्ही प्लास्टिक टाळतो...

गोव्यातील आयएचसीएल कंपनीने प्लॅस्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक पावले उचलली आहेत.
Plastic
PlasticDainik Gomantak

जागतिक पर्यावरण दिन- 2023 निमित्त, गोव्यातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी आणि पर्यटन क्षेत्रातील अग्रणी असणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) त्यांच्या हॉटेल्समध्ये एकल-वापर-प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला एक पाऊल पुढे नेले.

प्लॅस्टिकचे स्ट्रॉ काढून टाकणे, प्लॅस्टिकने गुंडाळलेल्या कोरड्या सुविधांच्या जागी पर्यावरणपूरक पर्याय आणणे आणि बॉटलिंग प्लांट्सचा वापर करणे अशा विविध उपाययोजनांचा समावेश आयएचसीएलने प्लॅस्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी केला आहेत.

आयएचसीएल गोवाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व्हिन्सेंट रामोस यांनी सांगितले, ‘समावेशन आणि व्यावसायिक जबाबदारी हे आमच्या डीएनए मध्ये अंतर्भूत आहे.

आम्ही गोव्यातील आमच्या हॉटेल्समध्ये सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक असणार्या प्लास्टिकवर कमी अवलंबून राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.’

Plastic
Portuguese Traces: खुणा पुसणे ही वसाहतवादाचीच नक्कल

गोव्यातील आयएचसीएल कंपनीने प्लॅस्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. प्रथम, आपल्या हॉटेलमधून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचउपक्रम त्यांनी हाती घेतला.

त्याऐवजी पुन्हा वापरता येण्याजोग्या काचेच्या पाण्याच्या बाटल्या, प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा स्विकार त्यांनी केला.

त्याआधी त्यांनी प्लॅस्टिक स्ट्रॉचा वापर बंद केला होताच तसेच टूथब्रश, शेव्हिंग किट इत्यादीं सुविधांसाठी पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून दिले होते.

Plastic
Nature: यक्ष फुलांची चाहूल

नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणे, सिंचनासाठी पाण्याचा पुनर्वापर करणे, ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करणे, रूम लिनेनच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देणे, विजेवरील वाहनांसाठी ( ईव्ही) चार्जिंग स्टेशन्सची स्थापना, वातावरणातील जल जनरेटरचा वापर आणि नाविन्यपूर्ण कूलिंग तंत्रज्ञानासाठी टेक इमर्ज (TechEmerge) कार्यक्रम राबविणे अशा पर्यावरणीय पद्धतींचा अवलंब त्यांनी केला आहे. गोव्यातील आयएचसीएलचे सारे नामांकित रिसॉर्ट्स, गोव्यातील लुप्तप्राय प्रजातीं तसेच स्थानिक वनस्पतींनी सजलेले आकर्षक लँडस्केप्स जतन करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com