रंगदेखणी : देवराईतील पाठ, प्राथमिक विद्यालयाच्या परिसरात देवराई झाडांचे महत्त्व

जस्थान जोधपूर येथील खेडाजली गावात, गावातील लोकांनी अमृताबरोबर एकत्रित होऊन गावातील झाडे वाचवली होती.
School Student
School StudentDainik Gomantak
Published on
Updated on

दशरथ मोरजकर

इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास पुस्तकात, झाडे वाचवणाऱ्या चिपको आंदोलनाची आठवण करून देणारा 'अमृताची कहाणी' हा पाठ आहे. राजाची माणसे गावातील झाडे तोडायला आली असता अमृता नावाची मुलगी गावकऱ्यासोबत झाडांना घट्ट मिठी मारून झाड वाचवण्यासाठी अनेकांना प्रेरित करते असा हा पाठ आहे. राजस्थान जोधपूर येथील खेडाजली गावात, गावातील लोकांनी अमृताबरोबर एकत्रित होऊन गावातील झाडे वाचवली होती.

साळ पुनर्वसन येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाचे परिसर अभ्यासाचे शिक्षक संकेत नाईक यांनी इयत्ता चौथीच्या मुलांना विद्यालयाच्या परिसरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या, सावंतवाडा-दोडामार्ग येथील श्री राष्ट्रोळी देवस्थान परिसरातील देवराईत खास नेऊन हा पाठ शिकवला. देवराईत असलेल्या झाडांचे महत्त्व त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विशद केले.

आमच्या पूर्वजांनी पवित्र भावनेतून वृक्षांची वाढ करून ते क्षेत्र सुरक्षित ठेवले व त्या उपवनांना ‘देवराई’ असे संबोधले. देवराईतील वृक्षांचे संवर्धन लोकश्रद्धेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केले जाते. देवराई ही वृक्षवाढीसाठी मनुष्याने व्यक्त केलेली कृतज्ञतेची एक भावना आहे. देवराईमध्ये असलेले अलिखित नियम व अटी यामुळे या देवराईतील जंगलाचे संवर्धन होते. देवराईप्रमाणेच आपल्या आजूबाजूच्या वनांचे देखील संवर्धन करावे असे सांगत संकेत नाईक यांनी पाठातील बोध समजावून सांगितला..

या वेळी दोडामार्ग येथील 'वनश्री प्रतिष्ठान' सदस्य संजय नाटेकर यांनी झाडाच्या आकारावरून, त्याच्या पानावरुन, झाडे कशी ओळखावी याची माहिती दिली. झाडे, पशू-पक्षी, कृमी कीटक यांचा संबंध त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे समजावला. आपल्या घराच्या आवारात असलेली झाडे व देवराईमध्ये असलेली झाडे यांमधल्या फरकाची माहितीही त्यांनी मुलांना दिली.

School Student
Blog: विद्याधर हा शुद्ध क्षत्रिय असावा का?

वनीकरण व्हावे या हेतूने देखील सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन- साळ आणि खरपाल या शाळेने मिळून तयार केलेले सुमारे 2000 सिडबाॅल विवेकानंद पर्यावरण जागृत फौज केरी या संस्थेकडे सोमवारी सुपूर्द करण्यात येणार आहे. शिक्षक संकेत नाईक यांनी सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले होते. 

पुनर्वसन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील व खरपाल शाळेची प्रभारी मुख्याध्यापिका प्रज्ञा दामले यांच्या संयुक्त पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अलीकडे म्हादई अभयारण्यातील ज्या जंगल क्षेत्रात आग लागली होती त्या परिसरात हे सिडबाॅल नंतर फेकण्यात येतील.

देवराईतील झाडांचे सर्वेक्षण

या भेटीवेळी विद्यार्थ्यांनी या देवराईची भ्रमंती केली व शिक्षकांच्या मदतीने झाडांचे सर्वेक्षण करून परिसर अभ्यास वहीत या झाडांची यादी तयार केली. वड, पायरी, भेरलीमाड, कोकम, बेल, फणस, आंबा, हूसकी, गेळा, बिबो, करमळ, दिणो, ओवळीण, शेतावरी, बोणकाळो, जांभूळ, काटेसावर, तिरफळ, किनळ, शेरवाड, आदी झाडांची नोंद विद्यार्थ्यांच्या वहीत झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com