Robotics Competition 2023 : जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत गोव्याची टीम करणार भारताचे प्रतिनिधित्व

ही ‘द गोवन रोबोटिक्स टीम’ भारताचे प्रतिनिधित्व सिंगापूर येथे 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या रोबोटिक्स स्पर्धेत करणार आहेत. Robotics Competition Team Goa will represent India World
Robotics Competition 2023
Robotics Competition 2023Dainik Gomantak

फर्स्ट ग्लोबल’च्या यंदाच्या जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘सेट’ने गोव्यातील प्रतिभावान टीमची निवड केली आहे. या टीममध्ये ‘स्टेम’ आणि ‘रोबोटिक्स’ यासंबंधी आपल्या समाजात प्रभाव निर्माण करण्याची लक्षणीय क्षमता आहे. ही ‘द गोवन रोबोटिक्स टीम’ भारताचे प्रतिनिधित्व सिंगापूर येथे 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या रोबोटिक्स स्पर्धेत करणार आहेत.

‘सेट’ (द स्टेम एज्युकेशन ट्रस्ट) ही संस्था भारतीय शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. भविष्यात नेतृत्व सांभाळण्याच्या दृष्टीने युवकांमध्ये बदल घडवून आणण्यावर ही संस्था विश्‍वास ठेवते. ना-नफा तत्त्वावर चालणारी ‘सेट’ ही गैर-सरकारी, नोंदणीकृत संस्था आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि रोबोटिक्स आणि ‘स्टेम’ शिक्षण प्रणालीद्वारे पुढील पिढीला सक्षम बनवणे या संबंधात ‘सेट’ चे काम चालते. कमी प्रतिनिधित्व असलेल्या समुदायाकडे ‘सेट’ विशेष लक्ष देते. रोबोटिक्स हे स्पर्धात्क क्षेत्र बनत चालले आहे. स्टेम ( STEM- सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनियरींग ॲण्ड मॅथ) विषयी जागृती होऊन त्याचे फायदे अधिकाधिक बालक आणि युवकापर्यंत पोहोचले पाहिजेत.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित तसेच रोबोटिक्स या क्षेत्रांचे महत्त्व ओळखून ‘सेट’ मानते की भारतातील प्रत्येक मूल- मग ते कुठल्याही भौगोलिक प्रदेशातले वा सामाजिक आर्थिक परिस्थितीतील असले तरी त्याला वरील क्षेत्रात दर्जेदार शिक्षण लाभले पाहिजे. रोबोटिक्स आणि ‘स्टेम’ शिक्षण विद्यार्थ्यांना विचारप्रक्रिया, समस्यांची सोडवणूक, विश्‍लेषणात्मक कौशल्ये या संबंधाने सुसज्ज करतात जे वर्तमान जगात यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक आहे.

शिक्षणविषयक वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘सेट’ ने ‘फर्स्ट ग्लोबल’ बरोबर भागीदारी करून ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांचा संघ निवडणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे ही जबाबदारी स्वीकारली आहे. ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ही रोबोटिक्स स्पर्धा ऑलिम्पिकप्रमाणेच दरवर्षी वेगवेगळ्या देशात आयोजित होते. सिंगापूर येथे आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत ‘रिनिवेबल एनर्जी’ चे महत्त्व अधोरेखित होणार आहे. या रोबोटिक्स स्पर्धेत १९० देशातील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.

Robotics Competition 2023
Blog : डॉ. स्वप्निल याने लिहिलेला चित्रपट व्हेनिस महोस्तव

‘फर्स्ट ग्लोबल’ दरवर्षी रोबोट आणि त्याचा प्रोगाम तयार करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील एका संघाला आमंत्रित करते. आपल्या ग्रहावरील सर्वात गंभीर अशा समस्येसंबंधी ठरवण्यात आलेल्या थीमवर 180 पेक्षा अधिक देशातील अनेक संघ काम करतात. या संघांमधून देशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्तम संघाची निवड करण्यात येते. वैश्‍विक समस्यांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या क्षमतांचा वापर करून जगातील युवकांमध्ये ‘स्टेम’ आणि ‘सहकार्य’ या दोन बाबींबद्दल जागरुकता तयार करणे हा या स्पर्धेचा उद्देश असतो.

अपूर्व काटकर, अथर्व साखळकर, साई प्रणव गांधी, विराज मराठे, व्यंकटेश धेंपो हे गोव्यातील निरनिराळ्या शाळांचे विद्यार्थी आहेत. ‘लेगोगोवा’ या नावाच्या संघाचे सदस्य असलेले हे सारेजण गेली ६ वर्षे रोबोटिक्समध्ये काम करत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धांमध्ये त्यांनी आतापर्यंत बक्षिसे जिंकली आहेत. ‘फर्स्ट ग्लोबल’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, देशातील अनुभवी आणि दिग्गज संघांशी स्पर्धा व खडतर निवड प्रक्रियेचा सामना करत राष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com