आगळे वेलकम

‘प्रत्येक समारंभ हा खास असतो आणि त्यात उपस्थितांवर छाप सोडण्यासाठी काहीतरी विशेष असणे महत्वाचे असते.
Welcome drink
Welcome drinkDainik Gomantak

Co-Co Fresh Welcome Drinks in Goa: कुठल्याही समारंभाला गेलात की प्रथम आपले स्वागत वेलकम िड्रंक देऊन केले जाते. त्यावेळी आपल्या हातात जे सोपवले जाते त्याकडे फारसे लक्ष न देता केवळ भिडेपोटी किंवा तहान शमवण्यासाठी ते पेय आपण ओठांना लावतो.

वेलकम ड्रिंक आज समारंभांच्या उपचारांचा भाग बनून राहिले आहे पण जेव्हा वेलकम िड्रंक म्हणून हातात वेगळ्या प्रकारचे काही येते तेव्हा त्या पेयाचा घुटका घेण्यापूर्वी कौतुकाच्या नजरेने त्याला प्रथम न्याहाळले जाते व त्यानंतरही ते कौतुक ते पेय प्राशन होईपर्यंत घुटक्या-घुटक्यांनी चालूच राहते.

एखाद्या समारंभात शहाळे वेलकम िड्रंक म्हणून हातात येणे हे फारसे अप्रुपाचे नाही पण जेव्हा त्यावर यजमानाचे किंवा दुसरे एखादे आकर्षक चित्र छापलेले असते तेव्हा त्यामधील चवदार पेयाचा घुटका घ्यायचे विसरुन त्यातील कल्पकतेला दाद देण्यात काही क्षण नक्कीच जातात. ही किमया गार्गी सागरकर आणि त्यांचे पती कुणाल यांची आहे.

त्यांचे म्हणणे आहे ‘प्रत्येक समारंभ हा खास असतो आणि त्यात उपस्थितांवर छाप सोडण्यासाठी काहीतरी विशेष असणे महत्वाचे असते. चित्र असलेले शहाळे जेव्हा पाहुण्यांच्या हाती दिले जाते तेव्हा त्यांच्यासाठी तो वेगळा अनुभव असतो. त्यांना आपले विशेष स्वागत झाल्यासारखे वाटते.’

गार्गी सागरकर यांनी आपल्या लग्नानंतर, वयाच्या २५ व्या वर्षी उद्योग जगतात आपले पाऊल ठेवले. त्यांच्या पतीचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय होता ज्यात सागरीकाचाही सहभाग झाला. या व्यवसायामधली आव्हाने, अनुभव यांचा आनंद घेत असतानाच २०२० च्या दरम्यान गार्गीला कॅन्सरच्या बाधेने ग्रासले.

त्याच सुमारास जग कोविड-१९ शी झुंजत होते. कॅन्सर आणि कोविड या दोन्ही समस्यांशी सागरिकाला त्या काळात अचानक सामना करावा लागला. पण पती कुणाल आणि कुटुंब यांनी तिला बराच आधार िदला व ती मानसिकरित्या दृढ राहू शकली.

Welcome drink
Goa Kashi Tourism: बीच नव्हे धार्मिक पर्यटनाला प्राधान्य, गोव्याला पछाडून काशी पर्यटकांच्या संख्येत अव्वल

त्याच काळात गार्गीने स्वतःच्या दुसऱ्या एका छंदाला आकार द्यायचे ठरवले. तो छंद होता स्वयंपाक बनवण्याचा. तिने कंबर कसली व त्या काळात गरजू कोविड पेशंटसाठी ती स्वयंपाक बनवू लागली. कुणालनेही तिच्या त्या निर्णयाला पाठिंबा दिला. गार्गीला पेशंटच्या वेदना कळत होत्या कारण तशा प्रकारच्या अनुभवातून ती देखील जात होती.

अशाप्रकारे तिचा ‘होम शेफ’ म्हणून प्रवास सुरु झाला. तिच्या त्याकाळच्या त्या संघर्षाने तिला कित्येक गोष्टी दिल्या ज्यात अनेक पुरस्कारांचाही समावेश आहे. आज सागरिका अनेक आस्थापनांना घरगुती जेवण पुरवते. ती म्हणते, ‘कॅन्सरपासून वाचल्यामुळे स्वतःबद्दलच्या शंका दूर करण्यासाठी मला मानसिक बळ मिळाले.’

Welcome drink
दृष्टी’चे जीवरक्षक होणार अद्ययावत, नवीन तंत्रज्ञान आणि बचत तंत्रांसह मिळणार सागरी धोक्यांचे प्रशिक्षण

कोको फ्रेश ही गार्गीची नविनतम कल्पना आहे. अशाप्रकारे पाहुण्यांच्या हातात दिले जाणारे वेलकम िड्रंक गोव्यात पुर्णपणे नवे आहे. ते पर्यावरणपुरक आहे हा त्याचा दुसरा एक विशेष आहे. त्याच्यावर छापलेले चित्र देखील पर्यावरणात मिसळून जाणारे साहित्य वापरुन तयार झालेले असते.

हे शहाळे आठ दिवस फ्रिजमध्ये ठेऊन देखील वापरता येते. भविष्यात, ज्यावेळी एखाद्या समारंभात तुमचे स्वागत करताना छापील चित्र असलेले शहाळे तुमच्या हातात जेव्हा दिले जाईल, तेव्हा तुमच्या यजमानांनी केलेले ते तुमचे स्वागत तुम्ही विसरु शकणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com