सांस्कृतिक संचित आणिअंधश्रद्धा

मुळात ब्रह्मांडाचा विचार केला तर दिशा ही सापेक्ष संकल्पना आहे. अंतरिक्षात वर खाली, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे काहीच असत नाही.
goa
goaDainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

भूपूजन आणि वास्तुशांती हा आपल्या सांस्कृतिक संचिताचा भाग आहे. भूमीपुजनामागे कुदळ मारून भूमीला दुखवण्यापूर्वी तिचे पूजन करण्याची भावना आहे.

समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शम् क्षमस्व मे

(समुद्र जिचे वस्त्र आहे आणि पर्वत जिचे स्तन आहेत अशा भूमीदेवते, तुझ्यावर पाय ठेवून चालावे लागते याबद्दल तू मला क्षमा कर) ह्या श्लोकात हीच भावना आहे.

वास्तुशांतीत भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश ह्या पंचमहाभुतांपासून नव्या वास्तुचे रक्षण व्हावे असा उद्देश आहे.

पण वास्तुशास्त्र ही अस्सल अंधश्रद्धा आहे. वास्तुशास्त्राचे नियम पाळायचे तर घरात संडासाची व्यवस्था करता येणार नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे संडास हा अपवित्र आहे व तो घराबाहेर असला पाहिजे. घराचा दरवाजा दक्षिणसमुख असू नये. घराचे स्वयंपाकघर ईशान्येला असू नये या विधानाला काहीच शास्त्रीय आधार नाही.

संकल्पना आहे. अंतरिक्षात वर खाली, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे काहीच असत नाही. केवळ मानवी सोयीसाठी पृथ्वीवर दिशाची संकल्पना राबवली जाते. पृथ्वी स्वतः भोवती फिरत असल्याने घराचा दक्षिणसमुख दरवाजा दिवस रात्रीच्या अवकाशात उत्तर, पूर्व व पश्चिम समुख बनतो.

नव्या घराला मिरची व लिंबू लावून किंवा काळी बाहुली लटकावून घराची दृष्ट काढली जाते. हा थोतांडाचा प्रकार आहे. त्यापेक्षा घराच्या बहिर्भागावर चादर पसरावी किंवा घराला बुरखा घालावा.

वा घराला बुरखा घालावा.

कोणताही नवा संकल्प करण्यापूर्वी कुलदेव, ग्रामदेव यांचा आशीर्वाद असावा हा सांस्कृतिक संचिताचा भाग आहे. त्यामुळे कौल घ्यायचाच झाला तर नवीन संकल्पाला तुझा आशीर्वाद दे, राखणेचा प्रसाद दे हेच मागणे असायला हवे. देवाला करू का नको हे विचारण्यासाठी कौल घेणे ही बाब अंधश्रद्धेच्या परिघात आहे.

लहानपणी एकदा मी आईला विचारले,''आई, भुते असतात का?" आई म्हणाली, ''मला कधीच भूत दिसले नाही. त्यामुळे भुते आहेत असे मला वाटत नाही. पण भुते असलीच तर ती आपली राखण करणारी भुते असतात. भुताला घाबरण्याची गरज नाही. भुते आपल्याला अपाय करणार नाहीत.''

वाईट, भयानक भुतांची संकल्पना आपण पाश्चात्य संस्कृतीकडून उचलली आहे.

असे असले तरी आई बुधवारी किंवा रविवारी चार रस्त्यावर तिन्हीसांजेला देंवचारासाठी सोरो, रोंट, विडी ठेवायची. देंवचार हा आपला राखणदार आहे असे आई म्हणायची. बोडगेश्वर, घोड्यावरून गस्त घालणारा दामोदर, विठोबा हे आपल्या वेशी सांभाळणारे चौकीदार असावेत. पुढे त्याला देवसदृश्य स्थान मिळाले असावे.

नव्या गाडीची किंवा नव्या यंत्राची पूजा करण्यात काहीच गैर नाही. पण नव्या गाडीला लिंबू, मिरची लावणे सर्वथा गैर आहे.

goa
Co-working spaces Goa: वर्फ फ्रॉम गोवा बीच; राज्य सरकार लवकरच सुरु करणार को-वर्किंग स्पेसेस

गर्भवतीचा सत्कार करणे, सुफलीकरणाचा विधी करणे हा संस्कार आहे तर वांझ स्त्रीला अपवित्र मानणे व तिला मूल पाळण्यात घालायला न देणे ही अंधश्रद्धा आहे.

कोकणीत देवाला एकेरीत संबोधतात. देव व भक्ताची आत्मीयता ह्यांत आहे पण कोकणीत स्वाम्यांना बहुवचनांत संबोधतात ही अयोग्य गोष्ट आहे.

उत्तर भारतात मुलांना संबोधताना ''आप'' म्हटले जाते. ''तुम'' नाही. त्यामुळे लहान मुलेही वडिलधाऱ्या माणसांना ''आप'' म्हणण्यास शिकतात.

संस्कृती ही नदीप्रमाणे प्रवाही असते. अंधश्रद्धा हे घाणेरडे डबके असते.

संस्कृतीसरितेतून आपण वैश्विक समुद्राकडे जातो. अंधश्रद्धेच्या डबक्यात आपण बेडूक बनून डरांव डरांव करतो.

संस्कृती ही स्वच्छ आरसा असते. त्यात आपल्या व्यक्तिमत्वाचे पडबिंब दिसते.

अंधश्रद्धेच्या तळ्यात आपले प्रतिबिंब पाहता पाहता आपण नार्सिसस होतो आणि एके दिवशी ह्या तळ्यात पडून बुडून जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com