WhatsApp मध्ये 1 जूनपासून होणार मोठे बदल! म्हणे, पैसेही द्यावे लागणार

व्हॉटस्अॅपवर १ जून पासून काही नवे नियम लागू होणार असून युजर्सला अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
WhatsApp
WhatsApp Dainik Gomantak

WhatsApp Latest News: व्हॉट्सअॅपच्या युजर्ससाठी नविन फिचर्स लाँच करत असते. पण यंदा व्हॉट्सअॅपचने काही नियमांमध्ये बदल केले आहे. आता 1 जून 2023 पासून WhatsApp बिजनेस अकाउंटसाठी WhatsApp द्वारे नवे बदल लागू केले आहे.

मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर कमाई करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या मालकीच्या कंपनी मेटाच्या वतीने भर दिला जात आहे. यासाठी व्हॉट्सअॅप आपल्या बिझनेसमध्ये अनेक बदल करत आहे.

WhatsApp बिझनेसच्या नवीन संभाषण श्रेणी आणि शुल्कांमध्ये बदल केले जात आहेत. व्हॉट्सअॅपद्वारे युटिलिटी, ऑथेंटिकेशन आणि मार्केटिंग अशा तीन प्रकारच्या व्यावसायिक पुढाकार श्रेणी लाँच करत आहे.

  • पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील

सध्या WhatsApp बिझनेसच्या प्रत्येक संभाषणासाठी 0.48 रुपये आकारले जातात. पण 1 जून 2023 पासून हे शुल्क बदलत आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, 1 जून 2023 पासून, युटिलिटी संदेशांसाठी प्रति रूपांतरण 0.3082 रुपये आकारले जातील. मार्केटिंग संदेशांसाठी प्रति रूपांतरण 0.7265 रुपये आकारले जातील. प्रत्येक मॅसेजसाठी अथेंटिकेशन प्राइसिंग नंतर जाहीर केली जाणार आहे.

WhatsApp
BSNL 4G आता टाटा नेटवर्कवर चालणार, सरकारी कंपनीने TCS ला दिली कोट्यवधीची ऑर्डर
What's App
What's App Dainik Gomantak
  • यूटीलिटी और अथेंटिकेशनसाठी द्यावे लागेल जास्त पैसे

युटिलिटी मॅसेज ग्राहकांना खरेदीनंतरच्या नोटिफिकेशन आणि बिलिंग स्टेटमेंट्स यांसारख्या चालू व्यवहारांबद्दल माहिती देतात. अथेंटिकेशन मॅसेज बिझनेसला एक-वेळच्या पासकोडसह अथेंटिकेट करण्याची अनुमती देतात. 

जे संभाषण उपयुक्तता आणि प्रमाणीकरण श्रेणीमध्ये जात नाहीत त्यांना प्रचारात्मक संभाषण श्रेणीमध्ये समाविष्ट केले जाईल. मार्केटिंग कन्वर्सेशनमध्ये जाहिरात आणि ऑफर व्यतिरिक्त, इन्फॉर्मेशन रिलेटेड अपडेट, इनवाइट  उपलब्ध आहेत.

  • WhatsApp बिझनेस म्हणजे काय?

WhatsApp बिझनेस अकाउंट सामान्य अकाउंटपेक्षा वेगळी असतात. बिझनेस अकाउंटमध्ये प्रमोशन आणि मार्केटिंग  पर्याय उपलब्ध आहे. प्रमोशन मॅसेज तुम्हाला तुमची प्रमोशनल स्टोरी दुसऱ्याच्या स्टोरीमध्ये अॅड करण्याची परवानगी देते. पण यासाठी चार्जेस आकारण्यात येणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com