Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak

Railway Rules: चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर? रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहीत नसेल

Railway News: भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते. या महागाईच्या युगात वाहतुकीची साधने खूपच महाग झाली आहेत.

Railway News: भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते. या महागाईच्या युगात वाहतुकीची साधने खूपच महाग झाली आहेत. अशा स्थितीत रेल्वे अजूनही गरीब आणि सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे.

रेल्वे तंत्रज्ञानाच्या अहवालानुसार, अमेरिका (America), चीन आणि रशियानंतर भारतात चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क (68 हजार किमी) आहे. एवढे मोठे रेल्वे जाळे हाताळणे सोपे नाही. अनेक वेळा रेल्वेचा अपघातही होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर काय होईल? ट्रेनमध्ये बसलेले हजारो प्रवासी वाचतील का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया...

तसेच, चालत्या ट्रेनमध्ये (Train) चालकाला झोप लागली तरी ट्रेन अपघाताची शिकार होणार नाही. याची अनेक कारणे आहेत. भारतात प्रत्येक ट्रेनमध्ये दोन लोको पायलट असतात. एक लोको पायलट झोपला तरी दुसरा कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळू शकतो. याशिवाय, एखादी मोठी समस्या आली तरी, तो आपल्या सहकारी लोको पायलटला जागे करुन परिस्थिती हाताळू शकतो. पण चालत्या ट्रेनमध्ये ड्युटीवर असताना लोको पायलट झोपी जाणे दुर्मिळ आहे. यासोबतच अशी अनेक शक्तिशाली तंत्रे आहेत, ज्यांच्या मदतीने अशा परिस्थितींना रोखता येते.

Indian Railway
Indian Railway: चुकूनही 'या' 5 चुका करू नका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

दोन्ही लोको पायलट झोपले तर?

ट्रेनमध्ये दोन लोको पायलट आहेत. समजा दोन्ही लोको पायलट झोपले असले तरी ट्रेन कोणत्याही अपघाताला बळी पडणार नाही. यामागचे कारण जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, ट्रेन चालवताना लोको पायलटने कोणतीही कृती केली तर इंजिन चालूच राहते. समजा, ड्रायव्हरने हॉर्नऐवजी काही काम केले, ब्रेक लावला, वेग वाढवला, तर ड्रायव्हर सक्रिय असल्याचा संदेश इंजिनपर्यंत पोहोचतो.

Indian Railway
Indian Railway: नवीन वर्षाच्या आधीच माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी रेल्वेकडून खास भेट

दुसरीकडे, काही वेळा ट्रेन एका ठराविक स्पीडवर चालते. अशा स्थितीत लोको पायलट ना ब्रेक लावू शकतो आणि ना वेग वाढवू शकतो. इतकेच नाही तर अनेक वेळा लोको पायलटला हॉर्न वाजवण्याचीही गरज नसते. अशा स्थितीत इंजिनपर्यंत कोणताही संदेश पोहोचत नाही. अशा परिस्थितीत, लोको पायलटला वेळोवेळी इंजिनमध्ये बसवलेला डेड मॅन लीव्हर दाबावा लागतो. डेड मॅन लीव्हर हे एक विशेष उपकरण आहे, जे इंजिनला सूचित करते की, ड्रायव्हर सक्रिय आहे. जर ड्रायव्हरने दर 2-3 मिनिटांनी हे उपकरण दाबले नाही तर इंजिन आपोआप ट्रेनचा वेग कमी करेल आणि थोड्या अंतरावर थांबेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com